शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाईट कॉलेज ऑफ इचलकरंजीने पटकावला फिरता चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:29 IST

अंबाजोगाई : येथील खोलेश्वर महाविद्यालयातर्फे बुधवारी घेतलेल्या नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नाईट कॉलेज ऑफ इचलकरंजी या महाविद्यालयाने ...

अंबाजोगाई : येथील खोलेश्वर महाविद्यालयातर्फे बुधवारी घेतलेल्या नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नाईट कॉलेज ऑफ इचलकरंजी या महाविद्यालयाने फिरता चषक पटकावला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.

या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. यावर्षीही राज्याच्या विविध विभागांतून ५४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे विषय : नवीन शैक्षणिक धोरण-परिवर्तनाची नांदी, असे देह हा राष्ट्रकार्यार्थ माझा, शहाण्यांनो..! राजकारणात या, कोरोनाने केले शहाणे या विषयांवर ही स्पर्धा झाली. यातील सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह नितीन शेेटे यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी अ‍ॅड. किशोर गिरवलकर, बिपीन क्षीरसागर, राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, शहर संघचालक दत्तप्रसाद रांदड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद तावरे व प्रा. दत्तप्रसाद गोेस्वामी यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. संपदा कुलकर्णी, भारतराव मदने, गोरख शेंद्रे यांनी केले.

स्पर्धेतील वैयक्तिक विजेते : समीक्षा ज्ञानेश्वर आव्हाळे, प्रथम (सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे) पारितोषिक : रोख रक्कम ३५०१ रुपये व सन्मानचिन्ह, अक्षय मारोती लिके, द्वितीय (नाईट कॉलेज ऑफ इचलकरंजी) पारितोषिक : रक्कम २५०१ रुपये व सन्मानचिन्ह, पूजा शीतलनाथ रोकडे, तृतीय (शिवाजी महाविद्यालय, रेणापूर) पारितोषिक : रोख रक्कम १५०२ रुपये व सन्मानचिन्ह.

===Photopath===

140321\avinash mudegaonkar_img-20210311-wa0093_14.jpg

===Caption===

अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या वतीने स्व. नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. त्यावेळी बोलताना कार्यवाह नितीन शेटे, व्यासपीठावर इतर मान्यवर