शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खामगांव - पंढरपुर या पहिल्या सिमेंट-कॉंक्रीट महामार्गाच्या कामाला माजलगाव येथून सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 18:02 IST

माजलगांव मतदारसंघातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 568 सी खामगांव - पंढरपुर या रस्त्याच्या सिमेंट-कॉंक्रीटकरणाच्या कामाला आज माजलगाव येथून सुरुवात झाली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळाच्या वतीने खामगांव - पंढरपुर हा 435 किमी लांबीचा रस्ता होणार  हा सिमेंट-कॉंक्रीट महामार्ग राज्यात माॅडेल ठरणारमाजलगांव - केज या 60 किमीच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने येत्या 24 महिन्यात 60 किमीचे काम होणार पूर्ण 

माजलगांव ( बीड) , दि. १० : माजलगांव मतदारसंघातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 568 सी खामगांव - पंढरपुर या रस्त्याच्या सिमेंट-कॉंक्रीटकरणाच्या कामाला आज माजलगाव येथून सुरुवात झाली. येत्या 24 महिन्यात 60 किमीचे काम पूर्ण होऊन सिमेंट-कॉंक्रीटचा हा महामार्ग एक मॉडेल ठरेल असा विश्वास माजलगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आर. टी. देशमुख व कार्यकारी अभियंता उदय भरडे यांनी व्यक्त केला.

आज दुपारी 2 वाजता खामगांव - पंढरपुर राष्ट्ीय महामार्गाच्या माजलगांव - केज या 60 किमीच्या पहिल्या टप्यातील कामाची सुरुवात तेलगांव जवळील कारी फाटा येथून करण्यात आली.  यावेळी बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ,  भा. ज. पा. तालुकाध्यक्ष हनुमान कदम, नगराध्यक्ष सहाल चाऊस, बबनराव सोळंके, दिलीप बिल्डकाॅन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर बिमलराम शुक्ला,  सभापती महादेव बडे, महादेव तोंडे, सचिन डोंगरे, माणिक दळवे, रामेश्वर सावंत, अर्जुन तिडके, दत्ता सोळंक, अमोल सोंळके, यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना आमदार आर. टी. देशमुख व उदय भरडे म्हणाले की, खामगांव - पंढरपुर हा राष्ट्ीय महामार्ग रस्ते विकास महामंडळाचे वतीने 435 किमी लांबीचा आहे. यातील 288 कोटी रूपये खर्चाचा माजलगांव - केज हा पहिला टप्पा आहे. महामंडळाने सहा हजार कोटींचे 25 मार्गाचे काम हाती घेतले आहे.

अत्याधुनिक मशीनने होणार काम या रस्त्यात 110 छोटे - मोठे पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. माजलगांव - केज या सिमेंट रस्त्याचे कामासाठी सात कोटी रूपयांची अत्याधुनिक पहीली मशिन आली असुन त्या द्वारे हे काम होणार आहे. दिलीप बिल्डकाॅन कंपनीच्या वतीने ही मशिन दररोज सिमेंटचा 1 किमी एका बाजुचा रस्ता पुर्ण करणार आहे.

जानेवारीत माजलगाव शहरात रस्ता जानेवारीपर्यंत माजलगांव शहरात रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. शहरामध्ये 24 मिटर चारपदरी रस्त्यामध्ये दुभाजक, फुटपाथ, नाल्या, पथदिवे करण्यात येणार आहेत. त्यासाठी या रस्त्यातील विजेचे खांब, अतिक्रमणे हटवुन दर्जेदार असे काम करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार देशमुख व  कार्यकारी अभियंता उदय भरडे यांनी यावेळी दिली.