शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘काळवटी’चे पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:20 IST

शहरासाठी राखीव पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या काळवटी तलावातील शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याचे उघडकीस आले आहे. नेमका कशामुळे हा प्रकार होत आहे, हे अद्याप निश्चित नसले तरी तलावाचे पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेकडो मासे मृत्युमुखी : परिसरात दुर्गंधी; आसपासच्या नागरिकांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शहरासाठी राखीव पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या काळवटी तलावातील शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याचे उघडकीस आले आहे. नेमका कशामुळे हा प्रकार होत आहे, हे अद्याप निश्चित नसले तरी तलावाचे पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यामुळे शहरातील नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण असून या माश्यांच्या मृत्यूच्या कारणांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी होती आहे.अंबाजोगाईसाठी काळवटी तलावाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मांजरा धरणाचे पाणी संपल्यानंतर याच तलावातून अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील वर्षीच्या पावसात हा तलाव पूर्ण भरला होता. मात्र, यावर्षी पावसाने दगा दिल्याने तलावात पाणी कमी आहे. मांजरा धरणही मृत साठ्यात असल्याने येणारा उन्हाळा कसोटीचा ठरणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन या तलावातील सर्व मोटारी बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, मागील काही दिवसापासून एका वेगळ्याच समस्येने डोके वर काढले आहे. तलावात दररोज मोठ्या संख्येने मृत मासे दिसून येत आहेत. या ठिकाणी जलतरणासाठी नियमति जाणाºया व्यक्तींच्या सर्वप्रथम ही बाब लक्षात आली. मृत माश्यांमुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली असून पाण्याचाही घाण वास येण्यास सुरु वात झाली आहे. मासेमारी करणारे काही व्यक्ती जमेल तसे हे मृत मासे तलावाच्या काठाला आणून टाकत आहेत तर काही मासे सडल्यामुळे पाण्यातच विरघळत आहेत. हे मासे नेमके कशामुळे मृत होत आहेत याबद्दल कोणाकडेही निश्चित माहिती नाही. इतर वेळेला मृत माश्यावर तुटून पडणारे कावळे देखील आता त्यांना शिवत नाहीत. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे याबाबत खुलासा होणे गरजेचे बनले आहे. पाणी दूषित झाल्यामुळे जर ही परिस्थिती उद्भवली असले तर आगामी टंचाईच्या काळात इथूनच अंबाजोगाईला पिण्यासाठी पाणीपुरवठा होणार असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने या समस्येचा निपटारा करावा अशी मागणी होत आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी नगर पालिकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही.तलावात अनोळखी वनस्पतीमुळे संशयदरम्यान, या तलावात मागील काही दिवसांपासून अनोळखी वेल दिसत असून त्याची पाने पाण्यावर तरंगत असतात. ही वेल दिसल्यापासूनच मासे मृत्युमुखी पडण्याचे आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे, असा दावा येथे नियमित येणाºया काही नागरिकांनी केला. कदाचित तरंगणारी विषारी पाने खाल्ल्यामुळेच मासे मरत असावेत, असा संशय त्यांना आहे.

टॅग्स :Beedबीडwater pollutionजल प्रदूषण