बीड : येथील बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमापूजन होऊन अभिवादन करण्यात आले. एपीआय योगेश उबाळे, पीएसआय पवन राजपूत, पोनि संतोष साबळे, पोह मुकेश गुंजाळ, पोकॉ बाळकृष्ण म्हेत्रे, मपोशि मेहर सय्यद, इंदुमती अढागळे यांची उपस्थिती होती.
बीड शहर ठाण्यात अभिवादन
बीड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर पोलीस ठाण्यात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. यावेळी सपोनि मुस्तफा शेख, घनश्याम अंतरप, पोउपनि पवनकुमार अंधारे, ज्ञानेश्वर सानप, पोना अशोक दराडे, पोह सुरेश घोरपडे, मपोशि शीतल काकडे, पोकॉ राहुल गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली.