शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी प्रवेशासाठी जिप, खासगी शिक्षकांची दमछाक; शिक्षक घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

गेवराई : गेल्या वर्षी मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पहिली ते ...

गेवराई : गेल्या वर्षी मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे सर्व मुले परीक्षाविना पास झाली. आता खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते पाचवी या वर्गासाठी विद्यार्थी शोध मोहीम सध्या जोरात सुरू असून, त्यामुळे शिक्षकांची या कोरोनातही दमछाक होताना दिसत आहे.

तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०२०पासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला. यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघाल्याने सर्वच ठिकाणी कडक लाॅकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे दुकाने, लग्न समारंभ, बस, बाजारसह सर्व काही बंद करण्यात आले होते. यात शाळा, महाविद्यालयदेखील बंद ठेवण्यात आली होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात तालुक्यातील जि.प.चे व खासगी शाळेचे ऑनलाइन क्लास सुरू होते. मात्र यात अनेक विद्यार्थ्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गाच्या परीक्षा रद्द करून थेट पास करण्यात आले.

आता तालुक्यातील जि.प.च्या ३२२ प्राथमिक शाळा, तर सहा माध्यमिक शाळा आहेत, तर ११४ खासगी अशा एकूण ४४२ शाळा आहेत. या सर्व शाळेचे मिळून ६८ हजार विद्यार्थी आहेत. आता विद्यार्थी पास झाले असल्याने व जि.प.च्या व खासगा शाळेचे शिक्षक वर्ग पहिली व वर्ग पाचवीचे विद्यार्थी शोधण्यासाठी कोरोना परिस्थितीतही घराबाहेर पडून घरोघरी फिरत आहेत. कारण आपल्या शाळेला विद्यार्थी मिळाले पाहिजेत हाच उद्देश ठेवून सर्व शाळेचे शिक्षक हे फिरत असून काही शिक्षक हे पालकाला फोन लावून विचारणा करत आहेत.

आपल्या शाळेत विद्यार्थी घेण्यासाठी संस्थाचालक व शिक्षक हे पालकांना आमिष म्हणून दफ्तर, बुट, पुस्तके शालेय गणवेश तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील विविध शाळेत दिसत आहेत.

विद्यार्थी शोधासाठी विविध शाळेचे शिक्षक हे दिवसभर विद्यार्थी शोध मोहिमेसाठी शहरात घरोघरी, ग्रामीण भागात, तांडे, वस्तीसह शेताच्या बांधापर्यंत जाऊ लागली आहेत.