शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

‘जॅमर’ ठेवणार वीज चोरांवर ‘वॉच’

By admin | Updated: March 1, 2017 01:16 IST

बीड वीज चोरीला आळा घालण्यासाठी अद्यापपर्यंत एक ना अनेक युक्त्या लढवल्या आहेत. असे असून देखील बीड अर्बनमध्ये ५५ टक्के वीज चोरीचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे.

राजेश खराडे बीडवीज चोरीला आळा घालण्यासाठी अद्यापपर्यंत एक ना अनेक युक्त्या लढवल्या आहेत. असे असून देखील बीड अर्बनमध्ये ५५ टक्के वीज चोरीचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे. या करिता गेल्या १० दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक ‘जॅमर’च्या माध्यमातून मिटरची तपासणी करुन वीज चोरी उघडकीस आणली जात आहे. या माध्यमातून १०० ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.बीड विभागाकडे दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा फुगत आहे. अशातच वीज चोरीचे प्रमाण देखील वाढत असल्याने वसुलीस अडथळे निर्माण होत आहेत. मिटरमधील वायरांची आलटपालट, मिटरवर चुंबक ठेवणे शिवाय वीज वाहिनीवरील वायर थेट मिटरला जोडून वीज चोरी केली जात आहे. यामधून बीड अर्बनला ५० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. वीज चोरी निष्पन्न करण्यासाठी ‘जॅमर’चा वापर केल्याने मिटर वापराची विस्तृत माहिती समोर येऊ लागली आहे. यामधून बीड अर्बनमधील १०० जणांवर कारवाई केली आहे. वीज चोरी निदर्शनास आल्यास वाढीव अ‍ॅम्पियरचे दर आकारले जाणार आहे. शिवाय महावितरण वीज चोरीचा तोटा सहन न करता आगामी काळात शहरात भारनियमन लादण्याच्या तयारीत आहे. ‘जॅमर’च्या माध्यमातून वीज चोरी ग्राहकांना आळा बसण्याच्या अनुषंगाने महावितरणने पाऊल उचलले आहे. बीड अर्बनसह ग्रामीण भागातही याचा वापर केला जाणार आहे. सद्यस्थितीला मार्चच्या अनुषंगाने महावितरणची वसुली मोहीम सुरू आहे. वसुली बरोबरच वीज चोरांवर कारवाईचे उद्दिष्ट बीड अर्बनने समोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.