शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय भाऊबंदकीवर आयजींची चौफेर टोलेबाजी !

By admin | Updated: March 17, 2017 00:20 IST

बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते.

बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते. पोलीस व जनतेत सुसंवादाचा अभाव आहे, अशी खंत व्यक्त करुन कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा दुरावा कमी झाला पाहिजे असे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी केले.अजित पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय भाऊबंदकी व पोलिसांवर येणाऱ्या ताणाची जाहीर कबुली देत चौफेर टोलेबाजी केली. बीडची प्रतिमा गुन्हेगारीमुळे मलिन झाली होती. मात्र, आता मुंबईनंतर बीड पोलिसांचे नाव निघत असल्याचे डॉ. योगेश क्षीसागर भाषणात म्हणाले होते. त्याचा धागा पकडून पाटील म्हणाले, या मताशी मी सहमत आहे. कारण मुंबईनंतर परळीत काका- पुतण्यात दरी निर्माण झाली. गेवराई व बीडही त्याला अपवाद राहिले नाही. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका शांततेत पार पडतील की नाही? याची मला अधिक काळजी होती, अशी जाहीर कबुली देतानाच पाटील यांनी अधीक्षक श्रीधर यांनी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पदाधिकाऱ्यांनी ठरवले तर बीडमध्ये प्रत्येक कार्यक्रम डीजेशिवाय होऊ शकतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के वाटा आहे. मात्र, स्वतंत्रपणे काम करु दिले जात नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. महिलांना अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यांचा कारभार त्यांना देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.जुन्या अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे ढिगारे असतात. त्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच पाटील यांनी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची पाटी कोरी आहे. त्यांनी स्वच्छतेचा ध्यास घेऊन शहर चांगले करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.पालिकेच्या स्वच्छतेविषयक कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयजी म्हणून हे सर्व सांगण्याचा मला अधिकार असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. हशा अन् टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम आटोपला.