शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते ! फंड नसतानाही प्रसिद्धीत राहण्यासाठी पंचायत समिती सदस्यांचा नवा ' फंडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:52 IST

शासन नियमानुसार पंचायत समिती सदस्यांना कोणताच वैयक्तिक विकास फंड नसतो. परंतु; आपल्या कार्यक्षेत्रात आपणच फंड आणून विविध विकास कामांसोबतच इतर अनेक कामे करून त्यावर स्वत:चे नाव टाकून केवळ जाहिरातबाजी करण्याचा नवीन फंडा पंचायत समिती सदस्यांनी आणला आहे.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यात पं. स. सदस्यांचा जाहिरातीसाठी नवीन फंडायोजनेचा उल्लेख चालतो, सदस्याचा नाही

कडा ( बीड ) : शासन नियमानुसार पंचायत समिती सदस्यांना कोणताच वैयक्तिक विकास फंड नसतो. परंतु; आपल्या कार्यक्षेत्रात आपणच फंड आणून विविध विकास कामांसोबतच इतर अनेक कामे करून त्यावर स्वत:चे नाव टाकून केवळ जाहिरातबाजी करण्याचा नवीन फंडा पंचायत समिती सदस्यांनी आणला आहे. फंड नसताना हा ' फंडा ' कशासाठी हेच जनतेला कळेनासे झाले आहे.  शासनाच्या पैशावर आपले नाव वापरणा-या पंचायत समिती सदस्यांवर  कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आष्टी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत चौदा पंचायत समिती सदस्य येतात. गणाचा विकास करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेऊन मंजूर असलेला निधी कोठे, कशा प्रकारे खर्च करायचा असे या सदस्यांनी सुचवावे आणि त्या गावात त्या निधीचा विनियोग करावा अशी पद्धत आहे.  मात्र, काही सदस्यांना विकास कामाचे सोडा, पण आपल्या गणासाठी  काय आले, हेच उमगत नाही मग जनतेला काय कळणार ? असे असताना काही सुशिक्षित महाभाग सदस्यांनी नवीन फंडा चालवला आहे. 

कोणताच आणि कसलाच वैयक्तिक फंड नसताना केवळ आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी  उभारलेले हायमास्ट दिवे, प्रवासी निवारे व इतर ठिंकाणी मार्गदर्शक नेत्यांसह स्वत:चा फोटो लावून अमूकतमुक पं. स. सदस्यांच्या फंडातून असा स्पष्ट नामोल्लेख पहायला मिळत आहे.  हा खटाटोप प्रसिद्धीसाठी की  राजकारणातील विकासासाठी हेच कळत नाही. 

तात्काळ नावे काढावीत शासनाच्या पैशावर उभारलेल्या कामावर नामोल्लेख असणा-या सदस्यांवर कारवाई करावी. तात्काळ ती नावे काढून टाकावीत नसता पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी किसान सेलचे आष्टी तालुकाध्य्क्ष दादासाहेब गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

योजनेचा उल्लेख चालतो, सदस्याचा नाहीज्या योजनेतून काम केले आहे त्याचे  नाव टाकता येते. मात्र, स्वत:च्या नावाचा उल्लेख करता येत नाही. याची पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येईल.- आप्पासाहेब सरगर, गटविकास अधिकारी, पं.स.आष्टी

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती