शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'ऑक्सिजन सुरू करणे आमचे काम नाही'; बीडमध्ये जबाबदारी झटकणाऱ्या दोन नर्स निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 16:58 IST

सोनाली पवार व दीपांजली काळे असे या निलंबीत केलेल्या नर्सचे नाव आहेत.

ठळक मुद्देनातेवाईकांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी या दोन्ही नर्सला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. डॉ.राठोड यांनी 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत कारवाईला दोन दिवस उशिर केला. आगोदर बदली करून त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला.

बीड : रूग्णाचा बंद ऑक्सिजन सुरू करण्याची विनंती केल्यानंतर ही आपली जबाबदारी नाही असे सांगत हात झटकणाऱ्या दोन नर्सवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. घटनेनंतर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असतानाही अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी या नर्सला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला होता. अखेर वरिष्ठांच्या सुचनेनंतर त्यांना जड अंतकरणाने या दोन नर्सला निलंबित करावे लागले.

सोनाली पवार व दीपांजली काळे असे या निलंबीत केलेल्या नर्सचे नाव आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास वॉर्ड क्रमांक सहा मधील रूग्णाचे ऑक्सिजन बंद असल्याने त्याला त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी धाव घेतल्यानंतर ऑक्सिजन लावण्याची विनंती केली होती. यावर कर्तव्यावर असलेल्या नर्सने आपली जबाबदारी झटकून हे काम वॉर्डबॉयचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तात्काळ हा प्रकार जिल्हाधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठांना कळविला. अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूखदेव राठोड यांनी वॉर्डमध्ये येऊन खात्रीही केली. यात त्यांना दोषी असल्याचे दिसले. यावेळी काही माध्यम प्रतिनिधीही सोबत होते.

नातेवाईकांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी या दोन्ही नर्सला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतू डॉ.राठोड यांनी 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत कारवाईला दोन दिवस उशिर केला. आगोदर बदली करून त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. नंतर हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यावर त्यांचे निलंबण करण्यात आले. केवळ आर्थिक व्यवहार झालेले असल्याने काही हितचिंतकांच्या दबावापाेटी डॉ.राठोड यांनी कारवाईला उशिर केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. 

या दोन नर्समुळे केडरची बदनामीजिल्हा रूग्णालयात सर्वात पुढे होऊन नर्सेस काम करत आहेत. दिवसरात्र आपल्या कुटूंबापासून दुर राहून रूग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच अभिमान राहिलेला आहे. परंतू अशा काही नर्सेसमुळे या केडरची नाहक बदनामी होत आहे. एवढेच नव्हे तर कारवाई टाळण्यासाठी चक्क अख्ख प्रशासन वेठीस धरण्याचा प्रयत्नही केला जातो. उपाेषण, आंदोलनाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

वॉर्ड क्रमांक ६ मधील दोन नर्सवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबचे आदेश डॉ.राठोडकडे आहेत. डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड