शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बीडमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल १५० कोटींना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 06:28 IST

मराठवाड्यात घोटाळेबाजांना मोकळे रान

औरंगाबाद : अधिक परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना १८ हजार ५६० कोटी रुपयांचा गंडा घातल्याची प्रकरणे ‘लोकमत’ने बुधवारी समोर आणली. त्यात मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला असून बीड जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जवळपास १५० कोटींना गंडा घालण्यात आल्याचे पुढे आले आहे.

फसवणुकीच्या बाबतीत उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. बीड जिल्ह्यात सहकारी पतसंस्थांचा प्रभाव कमी झाला असून सहकार विभागाच्या नियंत्रणातून मुक्त राहण्यासाठी मल्टीस्टेट संस्थांच्या शाखांचे जाळे वाढले आहे. बहुतांश संस्थांमध्ये गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला आहे. शुभकल्याण, परिवर्तन मल्टीस्टेट वादग्रस्त ठरल्या. बीड जिल्ह्यात १७० पेक्षा जास्त विविध मल्टीस्टेटच्या शाखा कार्यरत आहेत. मागील तीन वर्षात मल्टीस्टेटमध्ये जवळपास १५० कोटी रूपये अडकल्याने गुंतवणूकदारांचे स्वप्न भंगले आहे. अनेक गुंतवणूकदारांनी पोलीस ठाणे गाठले. तेथे गुन्हे

दाखल करण्यापलिकडे काहीही झालेले नाही. एकीकडे गुंतवणूकदार तर दुसरीकडे मल्टीस्टेटचे १६०० एजंट अडचणीत आले आहेत. माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेटचे पदाधिकारी गायब झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसाततक्रारी दिल्या आहेत. दुसरीकडे शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्याने विविध पोलीस ठाण्यात पदाधिकाºयांविरुद्ध १२ गुन्हे दाखल आहेत. यातील ६ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल केले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखांच्या माध्यमातून हावरगाव येथील शुभकल्याण मल्टिस्टेट पतसंस्थेने गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे़ या संस्थेचे चेअरमन व संचालकांविरुद्ध कळंब, वाशी व उस्मानाबाद ठाण्यांमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत़ आतापर्यंत सुमारे साडेआठ कोटी रुपयांची फसवणूक या पतसंस्थेकडून झाल्याचे समोर आले आहे़ जालना जिल्ह्यात एकूण १०५ सहकारी नागरी पतसंस्था आहेत. गेल्या पाच वर्षात रिझर्व्ह बँकांचे निकष न पाळणाºया जवळपास २६ पतसंस्था अवसायानात निघाल्या आहेत.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडल्यानंतर जिल्ह्यात पतसंस्थांचे व्यवहार नावापुरतेच सुरु आहेत. जिल्ह्यात नागरी व ग्रामीण पतसंस्थांची संख्या ५० असून १८४ कर्मचारी पतसंस्था आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पतपेढीच्याच दोन तक्रारी जिल्हा उपनिबंधकाकडे प्राप्त आहेत. त्या तक्रारीही संचालकाविरूद्ध संचालक अशा आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी