शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 16:46 IST

११५० उमेदवारांचे तीन दिवस समुपदेशन

ठळक मुद्देनातेवाईकही राहू शकतात उपस्थित२३ ते २५ जुलै अशा तीन दिवस मुलाखती होणार

बीड : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी २३ ते २५ जुलै अशा तीन दिवस मुलाखती होणार आहेत. समुपदेशन करून त्यांना पदस्थापना जागीच दिली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त अनुपकुमार यादव यांनी हे आदेश काढले आहेत. यासाठी ११५० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.

राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला होता. त्यानंतर रखडलेल्या पदभारतीबाबत गुणवत्ता यादी तात्काळ जाहीर केली. आता शुक्रवारी उशिरा आरोग्य सेवा आयुक्त अनुपकुमार यादव यांनी ८७७ जागांसाठी २३ ते २५ जुलैदरम्यान समुपदेशन व मुलाखती घेण्यासाठी वेळ निश्चीत केला आहे. ८७७ जागांसाठी ११५० उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. यासाठी दोन याद्या तयार केल्या असून पहिल्या यादीत ७४९ उमेदवार आणि दुसऱ्या यादीत ४०१ उमेदवारांचा समावेश आहे.

ही भरती होत आजारी आरोग्य सेवा सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये समाधान आहे. या मुलाखती मुंबईच्या आरोग्य भवनात सकाळी ९ वाजेपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने २९९१ उमेदवारांची गुणवत यादी जाहीर केलेली आहे. ११५० पैकी काही उमेदवार गैरहजर राहिल्यास आणि ८७७ जागा रिक्त राहिल्यास पुन्हा एक यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नातेवाईकही राहू शकतात उपस्थितयादीतील एखाद्या उमेदवारास काही अडचणीमुळे मुलाखतीस उपस्थित राहता आले नाही तर आई, वडील, भाऊ, बहिण, पती, पत्नी या पैकी कोणालाही उपस्थित राहता येणार आहे. यासाठी उमेदवार व प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे शासन मान्य ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तसेच एकदा अनुपस्थित राहिल्यास पुन्हा मुलाखतीची संधी देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. नियूक्त उमेदवाराला जागेवरच पदस्थापना पत्र दिले जाणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय