शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

बिंदू नामावलीची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:08 IST

राज्यातील जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या किचकट बनलेल्या बिंदू नामावलीची चौकशी करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एका आदेशाद्वारे समिती गठीत केली आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त, उपायुक्त (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य राहतील.

ठळक मुद्देउपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन; सहा मुद्द्यांवर होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यातील जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या किचकट बनलेल्या बिंदू नामावलीची चौकशी करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एका आदेशाद्वारे समिती गठीत केली आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त, उपायुक्त (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य राहतील.

बीड जिल्हा परिषदेमधील २०१५-१६ मध्ये मा. व. क़ यांच्याकडून मंजूर होऊन आलेल्या बिंदू नामावलीमध्ये इतर प्रवर्गातील अतिरिक्त शिक्षक खुल्या प्रवर्गात टाकून खुल्या प्रवर्गातील शिक्षक संख्या ५०० ही अतिरिक्त दाखवण्यात आली. मुळात आयुक्तांकडून मंजूर होऊन आलेल्या बिंदू नामावलीत खुल्या प्रवर्गातील फक्त ३२ शिक्षक अतिरिक्त होते. यात भज (क) ५८, भज (ड) ३५२, विजा (अ) ५७ या प्रवर्गातील शिक्षकांना खुल्या प्रवर्गात बेकायदेशीररित्या समाविष्ट केल्याचची तक्रार होती. त्यामुळे मुळात ३२ अतिरिक्त असलेला आकडा हा ५०० वर जाऊन पोहचला. या संदर्भात खुल्या प्रवर्गावर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया उमटली. असे चालत राहिल्यास पुढील १५ ते २० वर्षे खुल्या प्रवर्गात शिक्षकाच्या नौकरीची संधी गमवावी लागणार होती. तसेच आंतरजिल्हा बदली शिक्षकही १६ ते २० वर्षे या जिल्ह्यात बदली करुन येऊ शकणार नव्हते. या संदर्भात राज्याच्या खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, यवतमाळ, बीड, नगर, सातारा आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावलीची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे. १५ दिवसात खुल्या प्रवर्गातील बिंदूवर दर्शविलेल्या पदांची चौकशीचा अहवाल द्यावा लागणार आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य खुला प्रवर्ग संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह वरिष्ठ पातळीवर सदोष बिंदू नामावली बाबत चौकशीची मागणी तसेच प्राथमिक शिक्षक बिंदू नामावलीचे पुनर्गठन करावे अशी मागणी करण्यात येत होती.या मुद्द्यांवर होणार चौकशीजुन्या बिंदू नामावलीमध्ये मागावर्गीय प्रवर्गात दर्शविलेल्या उमेदवारांना नवीन बिंदू नामावलीमध्ये खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवण्यात येणे.सीईटी २०१० मध्ये मागासवर्गीय प्रवर्गात निवडलेल्या उमेदवारांना २०१७ मध्ये बिंदू नामावलीत अद्ययावत करताना खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविण्यात यावे.काही कर्मचा-यांची माहिती सापडत नाही असा शेरा मारलेला असून, संबंधित कर्मचाºयांना खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविण्यात यावे.सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांची नावे बिंदू नामावलीत दिसून येणे.वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक पदावर सामावून घेताना त्यांच्या रिक्त असलेल्या प्रवर्गावर सामावून न घेता त्यांना जून २०१७ च्या बिंदू नामावलीत खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविण्यात यावे.काही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचाºयांची जात बदलेली असणे.खुल्या प्रवर्गास न्याय देण्याची मागणीआता होणारी चौकशी नि:पक्षपातीपणे करुन बिंदू नामावलीचे पुनर्गठन करावे, चौकशी पारदर्शकव्हावी तसेच खुल्या प्रवर्गावर झालेला अन्याय दूर करावा. मुख्यत: ज्या ज्या प्रवर्गात शिक्षक अतिरिक्त झाले आहेत त्यांच्या मूळ बिंदूवरच त्यांना दर्शवण्यात यावे. खुल्या प्रवर्गात विनाकारण दर्शवू नये. खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा अ‍ॅड. गणेश करांडे यांनी दिला आहे.