शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून नागरिकांना होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

सुंदर माझे कार्यालय अभियाना अंतर्गत तहसील कार्यालयात उपक्रम अंबाजोगाई : सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत अंबाजोगाई तहसील कार्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थी ...

सुंदर माझे कार्यालय अभियाना अंतर्गत तहसील कार्यालयात उपक्रम

अंबाजोगाई : सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत अंबाजोगाई तहसील कार्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थी निर्माण करण्यात आलेल्या मदत कक्षाच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय दूर करणार आहेत. भारतीय जैन संघटना, तहसील कार्यालय व गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या पुढाकारातून या मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

शुक्रवारी या उपक्रमाचे उद्‌घाटन अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, प्रभारी तहसीलदार गणेश सरोदे, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष धनराज सोळंकी, तालुका अध्यक्ष निलेश मुथा, गटशिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी, प्रा. संध्या ठाकरे, नायब तहसीलदार रेणुका कोकाटे, आधार माणुसकीचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष पवार, शंकर बुरांडे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंजूषा मिसकर म्हणाल्या की, शासकीय योजना राबविताना लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रशासकीय कार्यपद्धती सुलभ होणार आहे. महाविद्यालयीन युवकांनाही आपले समाजाप्रति योगदान देता येणार आहे.

यावेळी शरद झाडके म्हणाले की, कोरोना काळातही लोकसहभागातून रुग्णालयास मोठी मदत झाली. आता सामान्य माणसाला त्यांची कामे सुलभ व लवकर व्हावीत, यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्यक्ष योजनांची माहिती, अर्ज तयार करणे, ज्येष्ठ नागरिक यांना मदत ही कामे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सहज होतील. या विद्यार्थ्यांना सर्व बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कामी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या मदत कक्षाचे उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सरोदे यांनी केले. संचालन मंजूषा खडके यांनी तर उपस्थितांचे आभार चंदन कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

090721\1541-img-20210709-wa0033.jpg

उदघाटन करताना अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर,उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार गणेश सरोदे,धनराज सोळंकी,चंदन कुलकर्णी,व उपस्थित