शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

महागाई दुप्पट अन् मजुरीत केवळ २३ रुपये वाढ; रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणे परवडेना

By शिरीष शिंदे | Updated: April 5, 2024 12:52 IST

महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

बीड : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने नुकतेच गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात मजुरीसाठीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या गोवा राज्यात प्रती दिन मजुरी ३५६ आहे, परंतु राज्यात मजुरी दर २९७ आहे. राज्यासह बीड जिल्ह्यातील मजुरीमध्ये केवळ २३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महागाईच्या जमान्यात रोहयो कामावर जाणे परवडत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना सुरू करताना अनेक बाबी डोळ्यासमोर ठेवल्या गेल्या. गावातच जलसंधारणाची कामे, बांधबंदिस्ती दुरुस्ती, भूमिगत पाट, मातीची धरणे, समतल चर, मजगी घालणे, दगडी संरोधक, सिंचन कालवे, सिंचन तलाव, जलाशयांचे नूतनीकरण यासह अनेक कामे मनरेगा योजनांतर्गत केली जात आहेत. या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. मजुरी कमी असली तर कामाची हमी असल्याने अनेक जण या कामावर जात आहेत. बहुतांश वेळा काम करूनही मजुरी वेळेवर मिळत नसल्याची प्रकरणे मागच्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आधीच मजुरी कमी त्यात विलंब यामुळे मजुरांची कोंडी होत आहे. वास्तविकत: मजुरीमध्ये भरघोस वाढ करणे अपेक्षित होते. परंतु, कमी वाढ करून एका प्रकारे मजुरांची थट्टाच केली जात आहे. महागाई वाढत असल्याने गोरगरिबांना जीवन जगणे कठीण झाले आहे. हाताला काम पाहिजे हे सत्य असले तरी दिवसभर राबून मोजकेच रुपये मिळत असतील तर कशामुळे रोहयो कामावर जावे, असा प्रश्न मजुरांपुढे निर्माण झाला आहे.

कामावर जावे की नाही महागाई वाढत चालली आहे, परंतु मजुरीमध्ये फारशी वाढ होत नसल्याने कामावर जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामावर गेल्यास प्रती दिन मजुरी ३०० रुपयापेक्षा अधिक मिळते. रोहयोची मजुरी अधिक वाढली पाहिजे.-संजय काळे, धानोरा

मजुरीत वाढ करारोजगाराची हमी आहे, गावाच्या जवळ किंवा गावातच काम मिळत असल्याने ही योजना लाभदायक आहे. परंतु, अकुशल मजुरी फारच कमी आहे. आजच्या घडीला प्रत्येक गोष्ट महागली आहे. घराबाहेर पडले की खर्चाला सुरुवात होते. त्यामुळे मजुरीत वाढ झाली पाहिजे.-अलका कुदळे, येळंबघाट

प्रत्येक राज्याचा दर वेगवेगळाएका अधिकाऱ्याने सांगितले की, मजुरी कमी असल्याची ओरड प्रत्येक राज्यात आहे. परंतु, हे दर महागाईच्या तुलनेत कन्झ्युमर प्राइज इंडेक्सच्या कृषी मजुरीच्या आधारावर निश्चित करण्यात आलेले असतात. सध्याच्या कन्झ्युमर प्राइज इंडेक्स दर हा ७.७ असल्याने त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याचा दर हा वेगवेगळा असल्याने त्यानुसार मजुरी वाढवली असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

असे आहेत दरराज्य- वाढलले मजुरीचे दर (रुपयांमध्ये)आंध्र प्रदेश-३००अरुणाचल प्रदेश-२३४आसाम-२४९बिहार-२४५छत्तीसगढ-२४३गोवा-३५६हरियाणा-३७४महाराष्ट्र-२९७

टॅग्स :Beedबीड