शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाइल, टॅब, इंटरनेटची भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व शिक्षणात सातत्य ठेवण्याच्या उद्देशाने शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांचे ग्रुप ...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व शिक्षणात सातत्य ठेवण्याच्या उद्देशाने शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवून त्या- त्या वर्गासाठी शिक्षक अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, लिंक पाठवून विद्यार्थ्यांकडून सराव करून घेऊ लागले. मात्र, ग्रामीण भागात मोबाइलपासून इंटरनेट सेवेचे प्रश्न निर्माण झाल्याने अनेक अडचणी आल्या. प्राथमिक पातळीवर शासनाच्या माध्यमातून स्वाध्यायवर भर देत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे प्रयत्न झाले. तरीही ऑनलाइन शिक्षण प्रणाली प्रभावी ठरली नाही. प्रत्यक्ष शिक्षणच योग्य असल्याचा सूर पालकांमधून उमटत राहिला, तसेच खासगी कोचिंग क्लासेसला प्रतिबंध असल्याने त्यांनीही ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात केली. विषयनिहाय शिक्षणासाठी पालकांनी आर्थिक भार सोसला. एक वर्ष कसेतरी गेले; परंतु सलग दुसऱ्या वर्षीही ऑनलाइन एज्युकेशन राहण्याची शक्यता लक्षात घेत पालकांना आपल्या पाल्यासाठी नवा ब्रँडेड, चांगल्या क्षमतेचे मोबाइल, संगणक, लॅपटॉप खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार त्यांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय डोंगल, पेन ड्राइव्ह तसेच नेटसाठीचा मासिक खर्च पालकांना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - ४४,८७७

दुसरी - ५०,७९०

तिसरी - ५३,२९७

चौथी - ४९,९८५

पाचवी - ५२,८३३

सहावी - ५२,८९७

सातवी -५२०१४

आठवी - ५१,८०२

नववी - ४९,८९३

दहावी - ४८,८९३

अकरावी- ४२,४४०

बारावी- ३६,७३२

मोबाइल, संगणक आणि इंटरनेटचा अतिरिक्त खर्च

प्रत्येक घरी प्रत्येक पाल्यासाठी मोबाइल किंवा संगणक आणि इंटरनेट आवश्यक झाले आहेत. जास्त क्षमतेचे रॅम, गतीने कार्य करू शकणारे मोबाइल घेण्याकडे कल आहे. चांगल्या प्रतीच्या मोबाइलसाठी १८ ते २५ हजार रुपये खर्च करावे लागतात. मोबाइलऐवजी ब्रँडेड कंपन्यांचे संगणक किंवा लॅपटॉप घ्यायचे असले तरी किमान ४० ते ५० हजारांपर्यंत रक्कम मोजावी लागते. त्याशिवाय इंटरनेटसाठी दरमहा, तीन महिन्यांचे किंवा वार्षिक पॅकेजवर खर्च करावा लागतो. वर्षाकाठी तीन ते चार हजार रुपये इंटरनेटवर खर्च झालेले लक्षातही येत नाही.

ऑनलाइनसाठी खर्च करूनही पदरी काही पडेना मुलीच्या ऑनलाइन शिक्षणासाठी स्वतंत्र मोबाइल खरेदी करावे लागले. कारण कामानिमित्त आम्हाला बाहेर जावे लागते. आधीच महागाई वाढली आहे. मिळणाऱ्या पगारातून सर्व खर्च भागवताना कसरत होते. इंटरनेटवर दरमहा २०० रुपये खर्च होतात. मोबाइलसाठी केलेला खर्च वेगळाच आहे. एवढा खर्च करूनही ऑनलाइन शिक्षण मुलांना समजत नाही.

-प्रदीप गुजर, पालक

-----------

मुलासाठी वेगळा नवीन मोबाइल घ्यावा लागला. ऑनलाइन शिक्षणात अनेक अडथळे आहेत. त्याचबरोबर खर्चही आहे. अभ्यासापुरते नेट घेऊन जमत नाही. महिन्याला दोनशे रुपयांपेक्षा जादा खर्च करावा लागतो; परंतु अभ्यास कमी आणि बाकी वेळेत व्हिडिओ पाहतात, गेम खेळतात. मोबाइलच्या आहारी गेली आहेत. खरे तर ऑनलाइन बंद ठेवून शाळा सुरू करायला पाहिजे.

-लईक अहमद, पालक, बीड

----------

मुलांचे होतेय नुकसान

आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ गॅजेट वापरणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. ऑनलाइनमुळे इंटरनेट ॲडिक्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे.

डोळ्यांचे आजार, डोके दुखणे, वेळी- अवेळी खाण्याच्या सवयी जडत आहेत. घरातच असल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. यातून ताणतणाव वाढतो. त्याचा इतरांवरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी ठरावीक वेळ ठरवूनच मोबाइल, टीव्ही, संगणकाचा वापर करायला हवा.

-डॉ. सुदाम मोगले, मानसोपचारतज्ज्ञ, बीड