राज्यातील १ ली ते ८ वी च्या विध्यार्थांना शालेय पोषण आहार देणाऱ्या कामगारांना ७५०० रुपये मानधन वाढ करा, आदींसह अनेक मागण्यांचे लेखी निवेदन देताना राज्याचे शिक्षण संचालक कार्यालयातील शालेय पोषण आहार अधीक्षक सुरेशराव वाघमोडे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. शालेय पोषण आहार कामगारांना इतर राज्यांप्रमाणे मानधनात वाढ करा, ज्या कामगारांचे वय ६५ वर्षे झाले आहे, त्या कामगारांना सेवा समाप्तीच्यावेळी ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान देऊन त्यांना ३००० रुपये पेन्शन द्या, हजेरी पटसंख्यानुसार त्याच कुटुंबातील दुसऱ्या कामगाराची नियुक्ती करा, यासह अनेक प्रलंबित मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे, केंद्रीय कमिटी सदस्य प्रा. ए. बी. पाटील, राज्य सचिव डॉ. अशोक थोरात, मन्सुरभाई कोतवाल, मीरा शिंदे, कुसुमताई देशमुख, कॉ. अनिल कराळे, कॉ. अमोल नाईक, कॉ. रमेश पंचाळ आदी राज्य पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
260321\anil mhajan_img-20210326-wa0076_14.jpg
===Caption===
शालेय पोषण आहार कामगारांना ७५०० रुपये मानधनात वाढ करा, यासह इतर मागण्यांसाठी शिक्षण संचालकांना निवेदन देण्यात आले.