स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक प्रमुख ३१,१११, द्वितीय पारितोषिक २१,१११, तृतीय पारितोषिक ११,१११, चतुर्थ पारितोषिक ७,७७७ विजेत्या संघाला बक्षीस देण्यात येणार असल्याचे कपिलेश्वर सी.सी. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. रा.काँ.चे युवक नेते दीपक मुंडे, रामेश्वर कोकाटे, अमरनाथ गित्ते पाटील, भाऊसाहेब गित्ते, भास्कर नागरगोजे, प्रल्हाद नागरगोजे, व्यंकट नाना हारणावळ, तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव नागरगोजे, उपसरपंच हनुमंत कामाळे, ग्रामपंचायत सदस्य युनूस बेग, गंगाधर नागरगोजे, देवीदास रोडे, वृक्षराज नागरगोजे, अनिल कामाळे, पी.एन. मुंडे, तुकाराम नागरगोजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाना नागरगोजे, आमर गित्ते, सुरेश नागरगोजे, अतुल नागरगोजे, आविनाश नागरगोजे, नितेश नागरगोजे (गुरू), गजानन नागरगोजे, सुदर्शन नागरगोजे, अती नागरगोजे, परमेश्वर नागरगोजे, माऊली नागरगोजे, दीपक नागरगोजे, अनिकेत नागरगोजे, प्रशांत नागरगोजे, संदीपान कांदे, ओम कांदे, यांच्यासह कपिलेश्वर सी.सी. टीमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौतुकास्पद कार्य केले. सर्वांना कोकाटे महाराजांनी शुभेच्छा दिल्या.
संगम येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST