शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इनामी जमीनप्रकरणी होणार चौकशी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून काही जणांनी नावावर करून घेतल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून काही जणांनी नावावर करून घेतल्या आहेत. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कार्यालयातून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील देवस्थानच्या इनामी तसेच वक्फच्या जवळपास २७ हजार एकर शेतजमिनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जणांनी नावावर करून घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील नामलगाव येथील गणपती मंदिराची इनामी शेतजमीन जुन्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन नावावर केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा फेर रद्द करण्यात आला. त्यानंतर इतर सर्व इनामी शेतजमिनींचे फेर रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणांतील अधिकारी व खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपायुक्त पराग सोमन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील काळात चौकशीनंतर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ....

राजकीय पुढाऱ्यांचा हात ?

देवस्थानच्या व इतर इनामी शेतजमिनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नावावर करून घेणाऱ्यांमध्ये बहुतांश सर्वपक्षीय नेत्यांचा हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तसेच चौकशी योग्य पद्धतीने झाली तर, पुढील काळात याप्रकरणांतील सर्व चेहरे समोर येतील, अशी आशादेखील त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.