शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकारात मिळवली शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची कोरी सेवा पुस्तिका

By शिरीष शिंदे | Updated: November 29, 2022 14:30 IST

केवळ राजपत्रित व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तिकेचा होतो वापर

बीड: माहिती अधिकारातून केवळ शासकीय माहिती प्राप्त होते हे सर्वश्रुत आहे, मात्र त्याही पलिकडे जाऊन गेवराई येथील एका माहिती अधिकार प्रशिक्षक तथा अभ्यासकाने माहिती अधिकारातून राजपत्रित व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणारी कोरी सेवा पुस्तिका मिळवली आहे. या कोऱ्या सेवा पुस्तिकेवर माहिती अधिकाराचे शिक्के असून शासकीय दस्त असल्याने ती प्राप्त झाली आहे. कोरी सेवा पुस्तिका मिळत असल्याने विद्यमान किंवा कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा पुस्तिका मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे मानले जात आहे.  

गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील किरण नारायण नंनवरे हे माहिती अधिकार अभ्यासक असून पुणे येथील यशदाचे प्रशिक्षण प्राप्त असलेले अभ्यासक यांनी मुंबई येथील मंत्रालयातील मुख्य सचिवांना माहिती अधिकाराच्या २००५ च्या कलम २ (त्र) किंवा अन्य कलमानुसार शासन सेवेत आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारी सेवा पुस्तिका कोरी स्वरुपात द्यावी अशी मागणी केली. जी माहिती संसदेला किंवा राज्य विधान मंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यासही नकार देता येणार नाही अशी टीप नंनवरे यांनी सदरील माहिती अधिकारी पत्रावर टाकली होती. प्रारंभी त्यांना नकार देण्यात आला मात्र प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव रा.का. धनवाडे यांच्या समोर सुनावणी झाली.नंनवरे यांनी माहिती अधिकारी अधिनियमातील कलम ६ (३) अन्वये हस्तांतरीत करणे किंवा माहिती अधिकार अधिनियमातील कलम २ त्र (३) नुसार माहिती देणे अपेक्षित असल्याचे अपिलमध्ये नमूद केले होते. सुनावनी दरम्यान झालेल्या युक्तीवादानंतर सह सचिव धनवाडे यांनी  किरण नंनवरे यांना कोरी सेवा पुस्तिका निशुल्क उपलब्ध करुन देण्याबबात संबंधितांना आदेशीत केले.

काय असते सेवा पुस्तिकेत ?शासन सेवेत असणाऱ्यांसाठी सेवा पुस्तिकेला अनन्य साधारण महत्व आहे. या पुस्तिकेचा नमूना शासनाच्या वित्त विभागामार्फत तयार करण्यात येतो. त्याची छापाई पुणे येथील शासकीय मुद्राणालयात होते. शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या राजपत्रित व अरापत्रित शासकीय कर्मचाऱ्यांकरीता एकाच दर्जाचे सेवा पुस्तक वापरण्यात येते. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक स्वतंत्र सेवा पुस्तिका दिली जाते. त्यामध्ये संबंधित कर्मचारी यांची चौकशी, बदली, दंड यासह इतरबाबी त्यात वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी नोंदी घेतात. त्यामुळे सेवा पुस्तिकेला विशेष महत्व असते.

टॅग्स :BeedबीडGovernmentसरकार