रेशनकार्ड मिळत नसल्याने ग्राहकांना अत्यल्प दरात मिळत असलेल्या अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील गरीब, गरजवंत, उपेक्षित पात्र असलेला समाज वंचित राहत आहे. अन्नाची गरज भागविण्यासाठी त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या कोरोनामुळे हलाखीचे जीवन जगताना जनता दिसत आहे. त्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी तसेच लोकांना रेशन दुकानावरील अन्नधान्य मिळण्यासाठी तत्काळ गरजू व पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपेक्षित समाज संघटनेचे अध्यक्ष ॲड. गौतम मिसाळ, सचिव ॲड. बी. एस. नाडे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी नितीन कांबळे, अशोक सकराते, विजय शिंदे, अरुण कांबळे, अर्जुन टाले, ऋषिकेश मिसाळ, ललीत ढाकरे, अमोल थोरात, मदन अलझेंडे, दिलीप गोरे, अशोक सटवा, श्री. देशमाने, राजाभाऊ भोसले, श्रीराम नाडे यांची उपस्थिती होती.
माजलगाव तहसील कार्यालयातून तत्काळ रेशनकार्ड द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST