शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक; हायवासह २ ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:56 IST

तालुक्यात दोन ठिकाणी वाळू तस्करी करणाऱ्या एका हायवा टिप्परसह दोन ट्रॅक्टर जिल्हा खनिकर्म विभागाने गुरुवारी रात्री कारवाई करुन पकडले.

ठळक मुद्दे३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गेवराई तालुक्यात खनिकर्म विभागाची कारवाई

गेवराई : तालुक्यात दोन ठिकाणी वाळू तस्करी करणाऱ्या एका हायवा टिप्परसह दोन ट्रॅक्टर जिल्हा खनिकर्म विभागाने गुरुवारी रात्री कारवाई करुन पकडले. यामध्ये जवळपास ३५ लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. यामधील कारवाई केलेला हायवा टिप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात व दोन ट्रॅक्टर गेवराई तहसील कार्यालयात लावले आहेत. दरम्यान या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणी अवैधरित्या वाळू साठा करुन ती वाळू रात्रीच्या दरम्यान टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. दरम्यान, याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी गुरुवारी रात्री गेवराई महसूल मधील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेत वाळू वाहतूक करणा-या वाहनांविरोधात कारवाई केली.सापळा रचून वाळू तस्करी करणारे टिप्पर ( एमएच ०४ जीसी १४७९), तर ट्रॅक्टर (एमएच २१ डी ४७४५) व अन्य एका विना नंबरचे ट्रॅक्टर अशा तीन वाहनावर कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले. या अवैध वाहतूक करणाºया वाहनासह वाळू असा एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला. ही कारवाई जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, किशोर तांदळे, सुरक्षा रक्षक सानप, गात, भोंडवे आदींनी केली. दरम्यान, महसूल पाठोपाठ जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनीही अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून, यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग