शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परळीत वडसावित्री तलावातून दारुचे बेकायदेशीर उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:30 IST

परळी तालुक्यातील वडसावित्री, वसंतनगर, धारावती येथे गावठी हातभट्टीचा पूर वाहतच आहे. येथे नवसागर, निकृष्ट दर्जाचा गूळ वापरुन वर्षानुवर्षे हातभट्टी दारूचे उत्पादन चालू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह परळी ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे काम सर्रास सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तालुक्यातील वडसावित्री, वसंतनगर, धारावती येथे गावठी हातभट्टीचा पूर वाहतच आहे. येथे नवसागर, निकृष्ट दर्जाचा गूळ वापरुन वर्षानुवर्षे हातभट्टी दारूचे उत्पादन चालू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह परळी ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे काम सर्रास सुरू आहे.

परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनेक गावात गावठी हातभट्टीची दारू विक्री जोरात सुरू आहे. धारावती, वसंतनगर, वडसावित्री नगर परिसरात दारूच्या भट्ट्या उघडपणे चालू आहेत. या ठिकाणी अनाधिकृत, बेकायदेशीर उत्पादित होत असलेली हातभट्टी दारू शहर व परिसरात पुरविली जाते. या दारूपायी अनेकांचा जीवही गेला आहे. या दारूची बाहेरही विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश भिसे व प्रा. अतुल दुबे यांनी केला आहे. तर गावठी दारूची निर्मिती व विक्री न थांबल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे अतुल दुबे यांनी दिला आहे.

धारावती तांडा येथील बेकायदेशीर गावठी दारूचे उत्पादन बंद करावे, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई राठोड यांनी वेळोवेळी संघर्ष केला. पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांचे दरवाजे ठोठावले. ग्रामीण पोलिसांना निवेदन दिले. अनेक वर्षे लढा देवूनही धारावती तांडा येथे गावठी दारूचा पूर वाहतच असल्याचे दिसून येते.

संबंधितावर कडक कारवाईपरळी तालुक्यातील धारावती तांडा येथील बेकायदेशीर व अनधिकृतपणे चालू असलेले दारूचे उत्पादन बंद करण्यात येईल व संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.- हर्षवर्धन गवळी,पोलीस निरीक्षक, परळी ग्रामीण ठाणे