शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये मास्क वापराकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

कोरोनाला दिले जातेय खुले आमंत्रण कोरोनाला दिले जातेय खुले आमंत्रण अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. ...

कोरोनाला दिले जातेय खुले आमंत्रण

कोरोनाला दिले जातेय खुले आमंत्रण

अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली. मात्र, एस.टी.त प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. तशी सूचनाही एस. टी.च्या दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष होत असून अनेक प्रवासी विनामास्कनेच प्रवास करताना दिसून येत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन घोषित करून जनजीवन ठप्प झाले होते. या लाटेत सर्वांत जास्त ग्रामीण भागात नुकसान दिसून आले. लहान लहान गावे हॉटस्पाॅट ठरली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या. कोरोना जनजागृती करण्यासाठी मोठे ठळक बॅनर, फलक, बसेसच्या मध्यभागी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ अशा मार्गदर्शन सूचना लिहिल्या आहेत. मात्र, तरीदेखील काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही, तर काहीजणांचा मास्क हनुवटीवच लावलेला असतो. यामुळे या सूचनांकडे नागरिक तसेच प्रवाशांचे दुर्लक्ष होत असून त्यांना गांभीर्य दिसून येत नाही. कोरोनामुळे मोठी हानी होऊनदेखील यातून आपण अजून काहीच बोध घेतला नाही, असेच म्हणावे लागेल.

कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच आपण या महामारीला हरवू शकू, कोरोनावर मात करू शकतो. जवळजवळ दोन महिन्यांपासून बंद असलेली एस. टी. सेवा चालू झाली आहे.

यात प्रत्येक प्रवाशांनी जवळ मास्क, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक देखील करण्यात आले आहे. मात्र, या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही. यासाठी कडक अंमलबजावणी करावी लागेल, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.