शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकांच्या रुग्णालयाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:46 IST

देशसेवेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावणाºया सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांसाठी शहरात केंद्र सरकारकडून इ.सी.एच.एस पॉलिक्लिनिक रूग्णालय उभारले आहे. मात्र या रूग्णालयात पाणी आणि तेथे जाण्यासाठी रस्ता अशा सुविधाच नाहीत. याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. सैनिकांविषयी पालिकेला सहानुभतीच नाही, असा आरोप सर्वसामान्यांमधून केला जता आहे.

ठळक मुद्देनगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : देशसेवेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावणाºया सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांसाठी शहरात केंद्र सरकारकडून इ.सी.एच.एस पॉलिक्लिनिक रूग्णालय उभारले आहे. मात्र या रूग्णालयात पाणी आणि तेथे जाण्यासाठी रस्ता अशा सुविधाच नाहीत. याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. सैनिकांविषयी पालिकेला सहानुभतीच नाही, असा आरोप सर्वसामान्यांमधून केला जता आहे.

जिल्ह्यातील १२०० माजी सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र शासनाकडून मोफत ई.सी.एस.एस पॉलिक्लिनिकची व्यवस्था करण्यात आली. शहरातील धानोरा रोड परिसरात बांधकाम विभागाच्या एका ईमारतीत हे रूग्णालय असून २१ जून २०१२ साली त्याची सुरूवात झाली होती. सहा वर्ष पूर्ण होऊनही अद्याप या रूग्णालयाला पालिकेकडून मुबलक सुविधा पुरविल्या नाहीत. रूग्णालयाकडे जाण्यासाठी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी केवळ पाईपलाईन आहे, मात्र पाणी अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णालय प्रशासनाला टँकरद्वारे पाणी खरेदी करण्याची वेळ आली आहे. ड्रेनेजची सुविधाही नसल्यामुळे रूग्णालयात व परिसरात दुर्गंधी पसरली आहे.महिन्याला १४०० रूग्णांवर मोफत उपचारविविध गंभीर व किरकोळ आजार जडलेले रूग्ण येथे दररोज मोफत उपचारासाठी येतात. महिन्याला जवळपास १४०० रूग्णांवर उपचार केले जातात. २४ तास रूग्णालयात उपचाराची सुविधा आहे. एखाद्या आजारावर सुविधा उपलब्ध नसेल तर इतर रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली जाते. सदरील सर्व खर्च ई.सी.एच.एस पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे हृदयरोग, हाडांचे आजारावरील महागड्या शस्त्रक्रिया या माध्यमातून केल्या जातात. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वा गंभीर आजाराच्या रुग्णांना इतरत्र रेफर केले जाते.येथे एक दंतचिकित्सक व दोन जनरल फिजिशियन आहेत.सुविधा नसल्याने त्रासरूग्णालय सुविधांसाठी पालिका व बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. रस्ता, ड्रेनेजची सुविधा नसल्याने त्रास होत आहे. इमारतीची डागडुजी, रंगरंगोटीसाठी सहकार्य करावे.-कर्नल डॉ.अश्विन शर्माव्यवस्थापक, ई.सी.एच.एस पॉलिक्लिनिक, बीड