शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील ? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून ...

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील ? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून ते केवळ एका व्यक्तीमुळे. माजी सैनिक बन्सीसाहेब जाधव यांच्या पुढाकारातून येथील स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे. पूर्वी अंत्यविधीवेळी बाहेर गावचे नाक मुरडणारे पाहुणे आज ‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ म्हणताना दिसत आहेत. प्रेक्षणीय स्थळ वाटावे इतपत स्मशानभूमीची सुधारणा करण्यात आली.

निजामकालीन जहागिरीचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे मराठा समाज (पाटील, देशमुख) मोठ्या प्रमाणात आहे. पांरपरिक स्मशानभूमी गावातील रेल्वे गेटजवळ भदाडा आंबा नामक जागेत होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, जायला धड रस्ता नव्हता. पावसाळ्यात खांदेकऱ्यांना त्रास व्हायचा. एक पाय रोवला की दुसरा काढायचा अशी बिकट अवस्था. रेल्वे पटरीने जावे तर रेल्वे, माल वाहतूक करणाऱ्या वॅगन कधी येतील याचा नेम नसे. त्यामुळे अंत्यविधीला जाणाऱ्यांचा जीव टांगणीला असायचा. अंत्यविधीला पाहुणा येणेही कठीण झाले होते. हे सर्व पाहून प्रा. सुरेश जाधव यांनी तपेश्वर मठ संस्थानाजवळ झोपडपट्टी भागातील स्वतःची विटभट्टीची जागा पाण्याच्या हौदासह स्मशानभूमीसाठी दिली. समाजाच्या निधीतून गेट बसविले आणि मृत्यूनंतर होणारी फरपट थांबली. पण कुंपण सुशोभिकरण, विकासाचे काय? वेळ कोणी द्यायचा या घोळात अनेक वर्षे गेली. अखेर माजी सैनिक तथा लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे चेअरमन बन्सीसाहेब जाधव यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सुरुवातीला स्वत: खर्च करत सुधारणेसाठी पुढाकार घेतला. माजी सरपंच ज्ञानोबा जाधव यांच्या सहकार्यातून रहिवाशांना विश्वासात घेत काटेरी कुंपण पूर्ण केले आणि विकासाला चालना मिळाली. साधे शेड असलेल्या स्मशानभूमीत चोहोबाजूने पत्रे वाढविले. सरण रचण्याआधी मृतदेह (तिरडी) ठेवण्यासाठी मोठा ओटा केला. तब्बल साठ टिप्पर काळी माती चोहोबाजूने टाकून वड, पिंपळ, लिंब, चंदन आदींसह शोभेची फुलझाडे लावली. यात प्रामुख्याने २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा भरणा अधिक आहे. आतमध्ये जाण्यासाठी कचखडी टाकून बाजूने विटा लावून रस्ता तयार केला. पितृ पक्षात मोहाच्या पानाशिवाय पितृ जेवू घातल्याचा विधी पूर्ण होत नाही. त्या मोहाच्या झाडाची जवळपास ३० रोपे लावली. तुळशीपत्र, मंजुळांशिवाय अंत्यविधी होत नाही, याची जाणीव ठेवत तुळशीबन तयार केले आहे. अस्थिकलश ठेवण्यासाठी लॉकर, अंत्यविधीसाठी आलेल्यांना विश्रांतीसाठी सिमेंटचे बाकडे आहेत. विशेष म्हणजे लावलेल्या संपूर्ण झाडांना नियमित पाणी मिळावे म्हणून सर्वत्रच ठिबक बसविले. रोपट्यांची आता दहा ते बारा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. बन्सीसाहेब जाधव स्वतः दररोज सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारून देखभाल करतात. त्यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आदर्शवत असे वैकुंठधाम प्रत्यक्षात साकार झाले आहे.

मृत्यू हेच अंतिम सत्य

सेवानिवृत्त सैनिक बन्सीसाहेब जाधव यांना स्मशानभूमी सुधारणेबाबत विचारले असता जन्मानंतर मृत्यू हेच आयुष्याचे अंतिम सत्य असून जन्माचा उत्सव करतो तसेच अंतिम ध्येय साध्य झाल्यास त्याचाही उत्सव व्हायला पाहिजे. सर्वांना प्रसन्न वाटावे या दृष्टीने स्मशानभूमीची सुधारणा करण्याचे ध्येय मी अंगीकारले असून आता अंत्यविधीला आलेल्यांना बसण्यासाठी शेड उभारायचे आहे. यात समाजबांधव यथाशक्ती सहकार्य करीत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

130821\0753img-20210807-wa0022.jpg

घाटनांदूर येथील जाधव-देशमुख या मराठा समाजाच्या स्मशानभूमीचा कायापालट झाला असून

बागेसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे . दुरुस्ती करून घेताना श्री लक्ष्मी नारायण पतसंस्था चेअरमन बन्सीसाहेब जाधव .