शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीकविमा दिला नाही, तर कंपन्यांचे पैसे सरकार देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

परळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा द्यावाच लागेल; अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही, असे आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला ...

परळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा द्यावाच लागेल; अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही, असे आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले, अशी माहिती किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.

२०२० चा खरीप पीकविमा मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट घेतली. सरकारच्या वतीने कृषिमंत्री भुसे यांच्यासह राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विमा कंपनीचे अधिकारी व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. ३० ऑगस्ट रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयावर किसान सभेने मोर्चा काढून दिवसभर धरणे आंदोलन केले होते. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कृषिमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करताना विमा कंपन्यांना निर्देश दिले की एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे सरसकट शेतकऱ्यांना पीकविमा परतावा रक्कम नियमाप्रमाणे वाटप करावी. जोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप करणार नाहीत तोपर्यंत राज्य शासन स्वतःच्या हिश्शाची दुसऱ्या टप्प्यातील प्रिमियमची रक्कम विमा कंपन्यांना देणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिली.

शेतकऱ्यांनी त्यांच्या अपरिहार्य कारणांमुळे नुकसानीची माहिती दिलेल्या मुदतीत कळवली नाही हा त्यांचा दोष नाही. समजा जर तो नियमभंग असेल तर विमा कंपन्यांनीदेखील कराराप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये ऑफिस व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत, कंपनीचा पुरेसा कर्मचारीवर्ग तिथे कार्यरत नाही हादेखील नियमभंगच आहे. ही किसान सभेचे आणि शेतकऱ्यांची भूमिका कृषिमंत्र्यांनी उचलून धरली. शेतकऱ्यांकडे चुकीचे बोट दाखविण्याचा कोणताही अधिकार कंपनीस उरत नाही, अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी कंपन्यांची कानउघाडणी केली. विमा कंपन्या शेतकऱ्यांना यथायोग्य विमा परतावा देतील, अशी ग्वाही कृषिमंत्री भुसे यांनी दिली.

आंदोलन अद्याप संपलेले नाही

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत किसान सभा स्वस्थ बसणार नाही. हे आंदोलन केवळ २०२० चा पीकविमा मिळविण्यापुरतेच मार्यदित नसून पीकविमा कायम शेतकऱ्यांना आधार देणारा, शेतकरीधार्जिणा असावा, यासाठी असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.