शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:14 IST

भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

ठळक मुद्देछत्रपती उदयनराजे भोसले : परळीतील गणेशपार येथील प्रचार सभेत प्रतिपादन

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पंकजाताई काम करत आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस इथे येऊन बसली तरी पंकजातार्इंचा विजय कुणी रोखू शकत नाही. भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.शुक्रवारी गणेशपार येथील प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मंत्री महादेव जानकर, डॉ. अमति पालवे,खा. डॉ प्रितम मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे, प्रा. टी पी मुंडे, राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, माजी आ. विजय गव्हाणे, अक्षय मुंदडा, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, व्यंकटेश शिंदे, राजेश विभूते, भास्कर रोडे, उत्तम माने, सुधाकर पौळ, सुरेश माने, वृक्षराज निर्मळ, बालासाहेब कराळे, भरत सोनवणे, संतोष सोळंके उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, मुंडे साहेबांनी लोक जोडण्याचं काम केलं. माझ्या वडिलांचे माझ्यावरचं छत्र हरपले, त्यावेळी मुंडे साहेबांनी वडीलांच छत्र माझ्यावर धरलं. मी वाट चुकलो असं कोणीतरी म्हणालं. पण मी सांगतो, आज मुंडे साहेब असते तर ही वेळ आली नसती. आता मुंडे साहेबांचं स्वप्नं पुर्ण करण्याचं काम माझ्या दोन्ही भगिनी करीत आहेत. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम होत आहे. दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्याचं काम मोदी साहेब मराठवाडा वॉटरग्रीडच्या माध्यमातून करीत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीकडे १५ वर्षे सत्ता होती. या काळात त्यांनी काय विकास केला? केवळ जातीजातीत भांडणं लावण्याचं काम केलं आहे. आमच्या भागातील कृष्णा खोरे योजनाही स्व.मुंडे साहेबांनी मार्गी लावली. मराठा आरक्षण देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले.त्यासाठी महायुतीच्या पाठीमागे उभा राहून माझ्या बहिणीला तुम्ही निवडून द्या, असे आवाहनही उदयनराजेंनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले