शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला मीच जबाबदार, पक्षातील लोकांनीच गद्दारी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:58 IST

पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली. कटप्पा बाहूबलीच्या पोस्टर प्रमाणे पाठीमागून खंजीर खुपसल्याचे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पराभवाचे खापर आ. सुरेश धसांवर फोडले.

ठळक मुद्देभीमराव धोंडे : चिंतन बैठकीत सुरेश धसांवर टीकास्त्र; आता जनतेसाठी वेळ देणार; कार्यकर्त्यांनीही व्यक्त केल्या तीव्र भावना

आष्टी/ कडा : तिकीट वाटपावेळीच आ.सुरेश धस यांनी माझ्याविषयी चुकीचा संदेश वरिष्ठांना देण्याचे वेळोवेळी काम केले. आष्टी विधानसभा मतदारसंघात मी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. पायी मतदारसंघातील गावोगावी गेलो. एवढे करूनही जनतेने मला डावलले. माझा पराभव झाला. त्याला मीच जबाबदार आहे. पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली. कटप्पा बाहूबलीच्या पोस्टर प्रमाणे पाठीमागून खंजीर खुपसल्याचे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पराभवाचे खापर आ. सुरेश धसांवर फोडले.आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात चिंतन बैठकीत ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. वाल्मिक निकाळजे,बबन झांबरे, दिलीप हंबर्डे, अशोक साळवे,अनुरथ सानप, महेंद्र गर्जे, अजय धोंडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.धोंडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील लीड, केलेली विकास कामे यामुळे माझा विजय निश्चित होता. पण हा आष्टीचा बाबा मला उमेदवारी मिळण्याआधीपासून गद्दारी करत आला. त्याने माझा पराभव करून शेवट केला. आ. धस यांनी प्रामाणिकपणे काम केले नाही. आपण यापुढे जनतेच्या सुख दु:खात सामील होऊन काम करण्यात वेळ देणार असल्याचे धोंडे म्हणाले.बैठकीत माजी जि.प.सदस्य रामराव खेडकर यांनी धसांवर टिकेची झोड उठविली. यावेळी अ‍ॅड. रत्नदीप निकाळजे, ईश्वर गव्हाणे, बाबुलाल भंडारी, एन. टी.गर्जे, शहादेव गिते, दादासाहेब जगताप, बाजीराव वाल्हेकर, पांडुरंग ननागरगोजे, अ‍ॅड. हनुमंत थोरवे, रामराव खेडकर, अनुरथ सानप सह मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलान दादा बन तर आभार शंकर देशमुख यांनी मानले.शिक्षक, स्वीय सहायकांवरही आगपाखडमतदारसंघातील निवडणुकीचे नियोजन ज्या त्या गावातील शिक्षक यांच्या हातात दिले गेल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याने नियोजन ढासळले.निवडणूक काळात शिक्षकांना बाजुला ठेऊन त्याची धुरा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर देऊन मुलासारखा विश्वास ठेवला तरच कार्यकर्ते काम करतील.एकही स्वीय सहायक कामाचा नाही. सर्व सामान्य जनतेला प्रतिसाद देत नाहीत. आता जुने बदलुन नवीन तरूण पोरं जवळ करून त्यांच्यावरच धुरा द्या असा सूर कार्यकर्त्यांनी काढला.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणSuresh Dhasसुरेश धस