शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या त्रासास कंटाळून पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:01 IST

पत्नी, मेहुणी आणि सासरा यांच्या त्रासाला कंटाळून अवघ्या चार वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अण्णासाहेब प्रभाकर सुरवसे (वय २८, रा. मथुरा नगर, परळी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देपरळीतील घटना :पत्नीसह मेहुणी, सासऱ्याविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पत्नी, मेहुणी आणि सासरा यांच्या त्रासाला कंटाळून अवघ्या चार वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अण्णासाहेब प्रभाकर सुरवसे (वय २८, रा. मथुरा नगर, परळी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.मथुरानगर येथे राहणारा अण्णासाहेब परळी औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी करत होता. चार वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यातील येळी येथील दिलीपराव मोजिते यांची मुलगी पूजासोबत त्याचे लग्न झाले होते. या दांपत्यास दीड वर्षाची एक मुलगी आहे. काही कार्यक्रमानिमित्त पूजा तिच्या मुलीस घेऊन एक महिन्यापूर्वी माहेरी गेली होती. २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता अण्णासाहेब यांची आई पूजाला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेली होती तर वडील पोथी ऐकण्यासाठी गेले होते. तर रात्रपाळी करून आलेला अण्णासाहेब विश्रांतीसाठी स्वत:च्या खोलीत झोपला. काही वेळानंतर अण्णासाहेब यांच्या भावजयीने खोलीचा दरवाजा वाजवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना बोलावून घेतले. दरवाजा तोडला असता अण्णासाहेब यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अण्णासाहेब यांच्या कपड्यांची झडती घेतली असता त्यात मृत्युपूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली. पत्नी पूजा, मेहुणी अलका पाखरे आणि सासरे दिलीप मोहिते यांच्याकडून सतत होणाºया त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आढळून आला. याबात अण्णासाहेबचे वडील प्रभाकर सुरवसे यांच्या तक्रारीवरून पूजा, अलका पाखरे व दिलीप मोहिते या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्या