शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा काटा काढणाऱ्यास पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:57 IST

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा कु-हाडीने वार करुन खून करणा-या पतीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे

बीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा कु-हाडीने वार करुन खून करणा-या पतीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माजलगाव येथील अतिरिक्त सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.वसंत गुणाजी काळे (५५, रा. कुंडी, ता. धारुर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून, आशाबाई असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्या घराशेजारीच चुलते भाऊराव बाबुराव काळे (रा. कुंडी) हे राहतात. १५ मार्च २०१७ रोजी दुपारी २.३० वाजता वसंतची मुलगी राधा ज्ञानोबा भांड ही रडत घरातून बाहेर आली. यावेळी भाऊरावांनी तिला रडण्याचे कारण विचारले. यावेळी राधा म्हणाली, माझे वडील वसंत हे आता घरी आले होते. तुझ्या आईस मारुन टाकले आहे मला दोन भाकरी बांधून दे असे म्हणत भाकरी घेऊन ते निघून गेले. त्यानंतर पाऊस सुरु झाला.अर्ध्या तासानंतर पावसाने उघडीप दिली. यावर भाऊराव काळे यांनी गावातील काही मुलांना वसंतचा शोध घेण्यासाठी पाठविले. यावेळी आशाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आशाबाई यांच्या गळ्यावर कुºहाडीने तीन ते चार वेळा वार केलेले होते. त्यानंतर भाऊराव यांच्या फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस ठाण्यात वसंत काळेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.सिरसाळा ठाण्याचे सपोनि एच. बी. बोराडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र ३ जून २०१७ रोजी न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासले. यात मुलगी राधा भांड, मुलगा माणिक काळे, पंच, साक्षीदार, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आलेल्या पुराव्यावरुन अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. वाघमारे यांनी वसंतला भादंवि कायद्याचे कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवत जन्मठेप व ५ हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने वरिष्ठ सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील आर. ए. वाघमारे, पैरवी अधिकारी जे. एस. वाव्हळकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCourtन्यायालय