शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रशासन व सामाजिक संस्था प्राणपणाने कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, या काळात ...

बीड : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रशासन व सामाजिक संस्था प्राणपणाने कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, या काळात पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील मानसिक थकवा वाढत असल्याचे चित्र आहे. हा थकवा कमी करण्यासाठी ना सुटी मिळतीय, ना त्यांच्या कुटुंबाला वेळ देता येतोय. त्यामुळे हा मानसिक थकवा घालवण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. या काळात मात्र, आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील चोख नियोजन करण्यात आल्यामुळे दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात वाढ झाली आहे. दोन्ही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा संपर्क दिवसभरात अनेकांशी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील मोठी आहे. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना याची लागण देखील झाली होती. तर, काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसिक थकवा घाल‌वण्यासाठी विशेष उपायोजना राबवून रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे.

.........................................................................................................................

कुटुंब अन् नोकरी सांभाळण्याची कसरत

आरोग्य विभागावर ताण वाढलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कर्तव्य बजवावा लागत आहे. दरम्यान यामुळे मानसिक ताण वाढलेला असून, तो घालवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिबिर अथवा इतर उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत.

-एक आरोग्य कर्मचारी.

.......................

आम्ही करत असलेल्या कामामुळे संपूर्ण कुटुंब कायम धोक्यात राहत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी कुटुंबापासून दूर रहावे लागत आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढला असून, तो दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात.

-एक पोलीस कर्मचारी.

.........................

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन व निर्बंधांचे पालन नागरिकांनी देखील पाळले पाहिजेत. जेणे करून काही प्रमाणात मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. आम्ही पण माणूस आहोत या दृष्टीने विचार करावा.

-एक पोलीस अधिकारी

...........

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून, प्राणायम, योगासने व मानसिकता सुस्थितीत राहण्यासाठी विविध प्रकारची शिबिरे घेण्याची गरज आहे. मात्र, त्या दृष्टीने अद्याप प्रशासनाकडून विचार करण्यात आलेला नाही.

एक आरोग्य कर्मचारी

..............

पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी योगा व इतर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. तर, ज्यांना आवश्यकता असेल अशा कर्मचाऱ्यांचे आम्हा अधिकाऱ्यांमार्फत समुपदेशन केले जाते. घरी उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत देखील आम्ही वेळोवेळी बोलत आहोत.

-सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड.

.................

रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागावरच ताण वाढलेला आहे. त्यामुळे अनेकांना मासिक थकवा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, रुग्णांवर उपचार करणे हेच प्रथम प्राधान्य असल्यामुळे विशेष योजना राबविणे अद्याप तरी शक्य झालेले नाही. मात्र, यापुढे विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.

-डॉ. आर. बी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

..............

एकूण आरोग्य कर्मचारी -

डॉक्टरर्स -

एकूण पोलीस अधिकारी २,१६८

पोलीस अधिकारी १८०

.............