शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उपक्रम शुभारंभाचा मान महिला कामगारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:33 IST

शिरूर कासार : शहरात माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत नगरपंचायतीने उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीचे गुरुवारी सफाई कामगार महिलांच्या हस्ते उद‌्घाटन ...

शिरूर कासार : शहरात माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत नगरपंचायतीने उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीचे गुरुवारी सफाई कामगार महिलांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले. महिला सफाई कामगार चतुरा शिंदे व राहीबाई चांदणे यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्याची संकल्पना मुख्याधिकारी किशोर सानप यांनी प्रत्यक्षात व स्वत: उपस्थित राहून पूर्ण केली. यावेळी वरिष्ट लेखापाल चंद्रकांत दामोधर, राहुल देशमुख, सागर कुंभार, कौसर शेख, मन्सुर शेख उपस्थित होते.

शिरूर नगर पंचायतने सुंदर व स्वच्छ शहर या उपक्रमात सहभाग घेतला असल्याने स्वच्छतेबरोबर अन्य वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. जागोजागी बोलक्या भिंती संदेश देण्याचे काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्यालयाजवळच माणुसकीची भिंत असून, त्यावर नको असणारे कपडे आदी सामान नागरिकांनी ठेवायचे व ज्यांना हवे असेल तर यांनी ते नेऊन त्याचा वापर करायचा आहे. गुरुवारी शुभारंभालाच अनेकांनी कपडे आणून ठेवल्याचे दिसून आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी मनसूर शेख, संजय गायकवाड, सुनील शेटे, बालाजी कदम, गणेश गोरमाळी, अनिल जगताप, भाऊसाहेब मोरे, गणेश कातखडे आदींनी परिश्रम घेतले.

शहरातील नागरिकांनी नको असलेले कपडे, अंथरूण, पांघरूण, सतरंजी, चादरी साहित्य या भिंतीवर ठेवून गरजवंतांसाठी मदतीचा हात द्यावा तसेच ज्यांना हवे असेल त्यांनी घेऊन जावे, असे आवाहन मुख्याधिकारी सानप यांनी केले आहे.

कुणीतरी याचा वापर करणार ही गोष्ट लक्षात घेऊन कपडे स्वच्छ करूनच ठेवल्यास अधिक चांगले असेही ते म्हणाले.

===Photopath===

130521\img_20210513_125034_14.jpg