शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर राहिलेल्या ८३ होमगार्डला ‘घरचा रस्ता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:11 IST

निवडणूक कालावधिमध्ये सर्व होमगार्ड यांना कायमस्वरूपी दोन महिने कर्तव्यावर नेमण्यात आले होते. दरम्यान या कालावधीमध्ये गैरहजर राहिलेल्या होमगार्डची चौकशी करून ८३ जणांना घरचा रस्ता दाखवला आहे.

बीड : पोलिसांच्या खाद्याला-खांदा लावून काम करण्यासाठी होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होमगार्डची भरती देखील करण्यात आली आहे. निवडणूक कालावधिमध्ये सर्व होमगार्ड यांना कायमस्वरूपी दोन महिने कर्तव्यावर नेमण्यात आले होते. दरम्यान या कालावधीमध्ये गैरहजर राहिलेल्या होमगार्डची चौकशी करून ८३ जणांना घरचा रस्ता दाखवला आहे.निवडणूक कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातून वाढीव बंदोबस्त मागवण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यात जवळपास ३०० पेक्षा अधिका होमगार्ड यांना विविध ठिकाणी बंदोबस्ताचे काम नेमून दिले होते. यावेळी सर्वांनी कर्तव्यावर हजर राहून पोलीस प्रशासनाच्या कामात मदत करण्याच्यासंदर्भात वरिष्टांनी सूचना देखील दिल्या होत्या, तसेच निवडणूक कालावधिमध्ये तयार करण्यात आलेल्या बंदोबस्त स्किममध्ये होमगार्ड याचा देखील समावेश केलेला होता. मात्र, गौरहजर राहिल्यामुळे इतरांवर या कामाचा भार आला. दरम्यान अशा कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या १०४ होमगार्डना अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी नोटीस देऊन १५ दिवसात खुलासा मागवला होता. त्यानंतर अनेकांनी खुलासा दिला, या खुलाशाची पडतळाणी करून १०४ पैकी १८ जणांचे खुलासे ग्राह्य धरण्यात आले व त्यांना पुन्हा सेवेची संधी देण्यात आली. तर ८३ जणांना होमगार्ड पदावरून १० डिसेंबरपासून ‘नारळ’ देण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेत असणाºया इतर ३ जणांनी राजीनामा दिल्याची देखील माहिती आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस