कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा व सम्राट क्रिकेट क्लब, चौसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. सदर स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली होती.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. राजपंगे एम.जी. हे उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. तांगडे म्हणाले की, तरुणांनी खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे तरच तुम्ही स्वत:च्या पायावर उभे राहू शकाल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजपंगे यांनी जीवनात खेळाचे किती महत्त्व आहे हे विशद केले.
या प्रसंगी रौळसगाव येथील क्रिकेट संघाला पहिले पारितोषिक तर चौसाळा येथील संघाला दुसरे पारितोषिक मिळाले. सदरच्या स्पर्धा चौसाळा महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी चौसाळ्याचे सरपंच मधुकर तोडकर, मंजीर शेख, मिलिंद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक शारीरिक शिक्षण विभागाचे शा.शि.नि. प्रा.डॉ. संजय कदम यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.डॉ. पंढरीनाथ हिरवे तर आभार प्रा.डॉ. विलास भिल्लारे यांनी व्यक्त केले. सदर स्पर्धा व कार्यक्रम कोविडच्या नियमांचे पालन करून घेण्यात आला.
===Photopath===
220321\22bed_5_22032021_14.jpg
===Caption===
बक्षीस वितरण