शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधितांच्या जुळल्या ‘रेशीमगाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:41 IST

एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या जोडप्याच्या बीडमध्ये रेशीमगाठी जुळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह निबंधक कार्यालयात हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

बीड : एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या जोडप्याच्या बीडमध्ये रेशीमगाठी जुळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह निबंधक कार्यालयात हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होतेपाली (ता.बीड) येथील इन्फंट इंडिया या संस्थेतील १९ वर्षीय मुलीचा औरंगाबाद येथील मुलासोबत विवाह जुळला होता. जन्मत:च एचआयव्हीची लागण झालेली मुलगी २००७ साली या संस्थेत दाखल झाली होती. तेव्हापासून तिचा सर्व सांभाळ, शिक्षण आणि इतर गरजा संस्थेने भागविल्या. नुकताच आयोजित वधु-वर परिचय मेळाव्यात तिची ओळख औरंगाबादच्या मुलासोबत झाली. यातुन त्यांनी विवाह करण्याचा निश्चय केला. गुरूवारी विवाह निबंधक कार्यालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा सोहळा थाटात पार पडला. इन्फंटचे संचालक संध्या व दत्ता बारगजेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वºहाडी म्हणून उपस्थित रहात नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद दिले.मुलाला कंपनीत नोकरीनवरदेव मुलाला औरंगाबाद येथे एका कंपनीत नोकरी आहे. या कंपनीमध्ये जेमतेम पगार असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह तो भागवतो. दोघेही एचआयव्ही बाधित असले तरी मुलाच्या कुटुंबियांनी मोठ्या मनाने त्यांना स्वीकारले आहे.सामाजिक योगदाननववधुला मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अय्यद यांनी सोन्याचे डोरले घेतले. बीडचे गौतम खटोड व डॉ. अनिल बारकुल यांनी जेवणाची, मनोज अग्रवाल यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच साडी व इतर कपडे जालना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले होते.पाचवा विवाह सोहळाइन्फंट इंडियामध्ये आश्रय घेतलेल्या पाच जोडप्यांचा आतापर्यंत विवाह सोहळा पार पडल्याचे संध्या व दत्ता बारगजे यांनी सांगितले. यापुढेही मुलांच्या म्हणण्यानुसार व स्थळ चांगले येताच विवाह लावून दिले जातील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडHIV-AIDSएड्स