राज्याच्या कृषीविस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधरण्याकरिता साह्य आत्मा सन २०२०-२१ अंतर्गत विविध कृषी विस्तार विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शेतीशाळा या विविध विषयांवर वर्गांचे विभाजन करून आत्माचे प्रकल्प संचालक डी. जी. मुळे, तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. या वर्गात वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गुंड यांनी ‘सीताफळ लागवड ते फळ जोपासना’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली. मंडळ कृषी अधिकारी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती सांगितली. प्रसंगी आत्मा विभागाचे ज्ञानेश्वर धस यांनी सूत्रसंचालन केले. या वर्गास तालुक्यातील प्रगतिशील फळबाग लागवड शेतकरी कल्याण कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आजच्या वर्गांचे पूर्ण नियोजन हे अविनाश सोळंके यांनी केले तर हे ‘आत्मा’चे संतोष देशमुख यांनी आभार मानले. या शेतीशाळेस शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
हिंगणीत सीताफळ लागवड तंत्रज्ञान शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST