शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये हिंदीचा पेपर; कडा, पाडळीत ११ विद्यार्थी रस्टिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:17 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून सुरु झालेल्या बारावी परीक्षेत दुसºया दिवशी द्वितीय भाषा हिंदीच्या परीक्षेतही कॉप्यांचा वापर विद्यार्थ्यांनी केल्याचे दिसून आले. आष्टी तालुक्यातील कडा आणि शिरुर कासार येथील पाडळी येथील केंद्रांवर भरारी पथकांनी अचानक तपासणी करुन कॉपी व परीक्षेदरम्यान प्रतिबंध असलेले गैरसाहित्य आढळलेल्या ११ परीक्षार्थींवर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देभरारी पथकाची कारवाई : परीक्षा केंद्रात मोबाईल, हेडफोन घेऊन जाणे आले अंगलट

बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून सुरु झालेल्या बारावी परीक्षेत दुसºया दिवशी द्वितीय भाषा हिंदीच्या परीक्षेतही कॉप्यांचा वापर विद्यार्थ्यांनी केल्याचे दिसून आले. आष्टी तालुक्यातील कडा आणि शिरुर कासार येथील पाडळी येथील केंद्रांवर भरारी पथकांनी अचानक तपासणी करुन कॉपी व परीक्षेदरम्यान प्रतिबंध असलेले गैरसाहित्य आढळलेल्या ११ परीक्षार्थींवर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली.

गुरुवारी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, मोहन काकडे यांच्या पथकाने कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालय या परीक्षा केंद्रावर तपासणी केली. या केंद्रात ३५२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळल्याने ५ परीक्षार्थींवर कारवाई करण्यात आली.

तसेच शिरुर कासार तालुक्यातील पाडळी येथील पाडळी हायस्कुल परीक्षा केंद्रावर निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भगवानराव सोनवणे, तुकाराम ठाकूर, केंद्रप्रमुख सुनंदा घुले यांच्या भरारी पथकाने तपासणी केली असता कॉपी बाळगणाºया ६ विद्यार्थ्यांवर रेस्टीकेटची कारवाई केली. या ठिकाणी गाईड, पुस्तकांच्या कॉपी केल्याचे दिसून आले.परीक्षेत चक्क मोबाईल, हेडफोनकडा येथील केंद्रात एका विद्यार्थ्याकडे चक्क वर्गात भ्रमणध्वनी आढळून आला, अन्य एकाकडे हेडफोन सापडले. उर्वरित तीन विद्यार्थ्यांकडे हिंदी विषयाच्या मायक्रोकॉपी सापडल्या. पाचही जणांवर बार्डाच्या नियमानुसार कारवाई झाली. संबंधित वर्गावर पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाºया शिक्षकास यापुढे बोर्डाचे कोणतेही काम देण्यात येऊ नये असा शेरा भरारी पथकाने दिला आहे.

इतरत्र कारवाई नाहीशिक्षण विभागाचे सहा भरारी पथक परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत.दोन दिवसात भरारी पथकाच्या कारवाया बीड, शिरुर, आष्टी तालुक्यातच झाल्या आहे.अन्य तालुक्यांमध्येही पथकाला भरारी मारावी लागणार आहे.