शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
4
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
5
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
6
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
7
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
8
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
9
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
10
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
11
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
12
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
13
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
14
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
15
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
16
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
17
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
18
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
19
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
20
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:15 IST

संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते, येत्या बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्दे संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. यावर्षी १६ मे ते १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार आहे. याची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव  (बीड ) : संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते, येत्या बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. 

पुरूषोत्तम मास अर्थात धोंड्याचा महिना. या महिन्याला हिंदू धर्मात असाधारण महत्व असते. या महिन्यात श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे अधिकमास उत्सव यात्रा भरते. या पर्वकाळात महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येथे दाखल होतात. गोदावरी काठावर वसलेले हे पुरूषोत्तमपुरी गाव राष्ट्रीय महामार्ग क्र- २२२ वर माजलगाव - गेवराई दरम्यानच्या सारवरगावपासून १० कि.मी. अंतरावर आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पर्वकाळात येथे लाखो भाविक येतात. यावर्षी १६ मे ते १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार आहे. याची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.

१५०० वर्षांपूर्वीचे आहे मंदिर पवित्र पापनाशिनी गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदीर असून या मंदीराचे बांधकाम सुमारे १५०० वर्षापुर्वी झाल्याचे शिलालेख येथे आहे. या मंदीराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदीर (उत्तराखंड) पध्दतीचे आहे व शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदीर आहे व ही दोन्ही मंदीर जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते. मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मुर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, पद्म असून मुर्ती मनमोहक अशी आहे.  हे मंदीर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना असून मंदीराच्या विटा या पाण्यावर तरंगतात व मंदीरातल्या गरुडध्वजा पंढरपुर येथील मंदिराची आठवण करून देतात. 

'पुरुषोत्तम' तेराव्या महिन्याचा स्वामी भारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात पुरूषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासाचे वर्णन धोंडे महाल या ग्रंथात असून बारा महिन्याचे बारा स्वामी असतात. परंतू उरी-सुरीच्या तेराव्या महिन्याचा स्वामी कोण होणार ? या वरून पुरूषोत्तमाने हे स्वामीत्व स्वीकारले व तेव्हापासून या महिन्याला 'पुरूषोत्तम मास' हे नाव पडल्याचा उल्लेख आढळतो. या महिन्यात जावयांना पुरणाचे धोंडे खावू घालण्याची प्रथा ही महाराष्ट्रातील घराघरात जोपासली जाते. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी व दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३३ धोंडे अर्पण करतात व सुखाची कामना करतात. त्यामुळे या महिन्यात राज्यातून अनेक महिला या यात्रेत सहभागी होत असतात.

हैद्राबाद येथे ताम्रपट व तांब्याचा गरुडनिजाम राजवटीत या स्थळाला फार मोठा मान होता. निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमीनी दिल्या होत्या. याबाबत ताम्रपट देवून त्यावर या जमिनी कोणाकडे वहितीसाठी द्याव्यात याचा उल्लेख होता. परंतू हे ताम्रपट व तांब्याचा गरुड हैद्राबाद येथील पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहीत आहे. यामुळे या क्षेत्राच्या देखरेखीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही.

निजामाकडून न्याय, पण सरकारडून अन्यायपौराणिकदृष्ट्या प्रसिध्द असणाऱ्या या मंदीराला निजाम सरकारने भरघोस मदत दिली होती. तीर्थक्षेत्राला न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते,  त्याकाळीच येथे अनेक कामे झाली. परंतू; महाराष्ट्र शासनाने मात्र अद्याप यास पर्यटन स्थळाचा दर्जा दिला नाही. यामुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदीर अद्याप विकासापासून कोसोदुर आहे. अनमोल ठेव्याचे जतन करून यास विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा  मिळावा जेणेकरून येथे पायाभूत सुविधा उभारल्या जातील. रस्ते, भक्तनिवास, वाहनतळ, मंदिराची डागडुजी अशी अनेक कामे येथे तत्काळ करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकBeedबीडgodavariगोदावरी