शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हतबलता ! 'या' गावाला अजूनही रस्ता नाही; प्रसूतीसाठी महिलेचा बैलगाडीतून प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:51 IST

Beed News जळगाव मजरा या गावाला रस्ता नसल्याने गावकऱ्यांना त्रास होताना दिसत आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झाला नाही पक्का रस्ताबैलगाडीतून प्रवास करावा लागल्याने गर्भवती महिलेला प्रचंड त्रास

गेवराई/तलवाडा : प्रसूती कळा येऊ लागल्यानंतर वाहनातून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात घेऊन जातात. मात्र, गेवराई तालुक्यातील जळगाव मजरा गावाला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत रस्ताच झालेला नसल्यामुळे गर्भवतीला प्रसूतीसाठी चक्क बैलागाडीतून घेऊन जावे लागल्याची घटना घडली आहे.

रस्ता ही विकासाची वाहिनी समजली जाते. अनेक गावांना पक्के रस्ते नाहीत. जळगाव मजरा या गावाला रस्ता नसल्याने गावकऱ्यांना त्रास होताना दिसत आहे. अंबेसावळी येथे सासर असलेली विवाहिता अर्चना गुंदेकर माहेरी जळगाव मजरा येथे बाळंतपणासाठी आलेली होती. बुधवारी त्यांना प्रसववेदना होत असल्याने दवाखान्यात नेण्याचे ठरले. पण पावसामुळे रस्त्यावर चिखल असल्याने कच्च्या रस्त्यावरून वाहन येणे शक्य नव्हते. रुईपर्यंत कच्च्या रस्ता असल्यामुळे २ कि.मी. अंतर बैलगाडीतून प्रवास करावा लागल्याने गर्भवती महिलेला प्रचंड त्रास भोगावा लागला.

तालुक्यातील कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गापासून जवळच  आणि रुई धानोराच्यामध्ये असलेल्या जळगाव मजरा या गावाची लोकसंख्या २ हजारांच्या जवळपास आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावाला जाण्यासाठी कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात गावात येण्या-जाण्या साठी रस्ता रहात नाही. रस्त्यावर नुसता चिखल व पाणी साचते. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे  ९ किलोमीटर अंतर कापून निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. या महिलेला प्रसुती कळा येऊ लागल्याने व गावात कोणतीच गाडी येत नसल्याने तिला बैलगाडीतून चिखल तुडवीत दोन किलोमीटर अंतरावरील रुई गावापर्यंत  आणले. तेथून अ‍ॅपे रिक्षाने थेट बीड येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रसूती करण्यात आली. प्रशासन व लोकप्रतिनिधीने या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्ता चांगला चांगला करावा, अशी मागणी गावातील नागरिक महारुद्र खुणे, महादेव बोबडे, गोविंद खूणे, बबन ईदगे, मधुसूदन खुणे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाBeedबीडroad safetyरस्ते सुरक्षा