शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालावरच्या गरीब कुटुंबांना जळगावहून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:27 IST

कोरोनाने रोखली भिक्षा : एरंडोलचे उपजिल्हाधिकाऱ्यांकडून १४ कुटुंबांना किराणा किट माजलगाव : राष्ट्रीय ...

कोरोनाने रोखली भिक्षा : एरंडोलचे उपजिल्हाधिकाऱ्यांकडून १४ कुटुंबांना किराणा किट

माजलगाव : राष्ट्रीय महामार्गावर फुले पिंपळगाव शिवारात पालावर राहून भिक्षुकी मागणाऱ्या गोसावी समाजावर लॉकडाऊन व गावबंदीमुळे उपासमारीची वेळ आली असताना जळगाव जिल्ह्यातील एरंडोलचे उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांनी सामाजिक कार्यकर्ते भास्कर गिरी यांच्यामार्फत १४ कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढा किराणा वाटप केला आहे. आणखी २६ कुटुंबांना किराणा किटची आवश्यकता असून, यांच्याकरिता दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

माजलगाव तालुक्यातील पालावर राहणारे औंढा व हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गरीब गोसावी समाजाचे हे कुटुंब खेडोपाडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र, सध्या वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे गावबंदी केल्याने भिक्षा बंद झाली आहे, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे समजल्यानंतर उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांनी सामाजिक कार्यकर्ते भास्कर गिरी यांना फोनवर संपर्क करून पालावर राहणाऱ्या गोसावी समाजाची माहिती घेतली. गोसावी यांनी लगेच व्यवस्था करून २९ एप्रिल रोजी दुपारी माजलगाव येथे १४ कुटुंबांना किराणा किट भास्कर गिरी यांना वाटप करण्यास सांगितले. गिरी यांनी सहकारी पुरुषोत्तम करवा, उमेशकुमार जेथलिया, प्रा. सुदर्शन स्वामी, रविकांत उघडे, विजय मस्के यांना सोबत घेऊन तात्काळ किराणा किटचे वाटप केले आहे. ही सर्व मदत विनय गोसावी यांनी केली.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांना भिक्षेसाठी जाता येत नाही. म्हणून ही तात्काळ मदत आहे. आणखी कोणी राहिले असेल तर त्यांनाही किराणा किट देऊन मदत केली जाईल.

-विनय गोसावी,

उपजिल्हाधिकारी, एरंडोल जिल्हा जळगाव.

===Photopath===

290421\13453215purusttam karva_img-20210429-wa0024_14.jpg