शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईतून आरोग्य पथक सांगलीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:53 IST

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे पथक रवाना

अंबाजोगाई (बीड ) : महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी व पूरग्रस्तांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टरांचे पथक शुक्रवारी सकाळी औषधांचा मोठा साठा व वैद्यकीय उपकरणे घेऊन सांगलीकडे रवाना झाले आहे.  

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर व त्या परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाच्या तडाख्याने  पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. यातून उद्भवलेल्या परिस्थितीने पूरग्रस्तांना वैद्यकीय उपचाराची तत्काळ आवश्यक्त असते. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व विभागातील २३ डॉक्टर्स, पाच परिचारिका व दोन वाहनचालक अशा तीस जणांचे पथक निर्माण केले. आवश्यक औषधांचा साठा, ईजीसी मशीन्स व अत्यावश्यक उपकरणे घेऊन हे पथक शुक्रवारी सकाळी सांगलीकडे रवाना झाले. 

पथकात यांचा समावेश पथकात डॉ. निखिल काळे, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. प्रभाकर बिचकाटे, डॉ. संकेत वैद्य, डॉ. सागर मावळे, डॉ. तौहराम शकील, डॉ. किशोर मुखमले, डॉ. कौशिक अन्सारी, डॉ. दत्तात्रय नागरखेडे, डॉ. अशफाक सय्यद, डॉ. मोहित विश्वकर्मा, डॉ. शरद शेळके, डॉ. विजयकुमार पवार, डॉ. जे. कृष्णन, डॉ. राहुल बागल, डॉ. पवन राठोड, डॉ. अविनाश मुंडे, डॉ. सागर माने,  डॉ. आकाश वराडे, डॉ. पुष्पदंत रुग्णे, चित्रलेखा बांगर, आशा सोनवणे, पूर्वा दहिफळे, आशा यादव, सय्यद नजिर, या परिचारिकांसह दोन वाहनचालकांचा समावेश आहे. पथकाला अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक राकेश जाधव, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. विनोद वेदपाठक, डॉ. नागेश अब्दगिरे, डॉ. सचिन चौधरी, डॉ. योगेश गालफाडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. 

आवश्यकतेनुसार मदत करू पथक किमान एक आठवडाभर रुग्णसेवा करणार आहे. आगामी काळात गरज भासल्यास दुसरे पथकही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात येईल. आपत्तीत सापडलेल्या आपल्या बांधवांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी उत्स्फुर्तपणे जाण्याची दर्शविलेली तयारी हे रुग्णालय प्रशासनासाठी अभिमानाची बाब आहे. - डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता

टॅग्स :doctorडॉक्टरfloodपूरAmbajogaiअंबाजोगाई