शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा छान; डॉक्टरांपेक्षा सुरक्षारक्षकांचीच भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:19 IST

सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीमुळे जिल्हा रूग्णालय पुन्हा एकदा बदनाम झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीमुळे जिल्हा रूग्णालय पुन्हा एकदा बदनाम झाले आहे. येथे जरी आरोग्य सेवा चांगली मिळत असली तरी येथे येणाऱ्यांना मात्र सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की व अरेरावी केली जात असल्याचे समोर आले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना आणि वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही अधिका-यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.मागील काही महिन्यात जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवेतील कारभार सुधारला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मात्र, दुस-या बाजूला रूग्ण व नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेले रक्षकच आता त्यांना धक्काबुक्की करू लागले आहेत. वास्तविक पाहता या रक्षकांना रूग्ण व नातेवाईकांना अरेरावी किंवा धक्का लावण्याचा कसलाच अधिकार नाही. मात्र, दादागिरी करीत सर्वसामान्यांच्या संयम व शांततेचा फायदा घेत येथील रक्षक त्यांना धक्काबुक्की करतात. तसेच महिला रक्षकही पुरूषांना धक्काबुक्की व अरेरावी करतात. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्यांना अपमान सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे यापूर्वी असे प्रकार घडल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सकांनी यावर कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे रक्षकांचे मनोधैर्य वाढले असून, दिवसेंदिवस मुजोरी वाढत चालली आहे. त्यांच्या या वर्तणुकीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमाही मलीन होत आहे. त्यामुळे या रक्षकांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महिला रक्षक उगारतात दंडुकायेथील महिला रक्षकही पुरूषांवर दंडुका उगारतात. त्यांना धक्काबुक्की करतात. प्रसुती विभाग व मुख्य प्रवेशद्वारावर असे प्रकार नेहमी पाहवयास मिळतात.दिवसेंदिवस हे प्रकार वाढत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून प्रतिमा मलीन होत चालली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर