शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

बीड : महिलेच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने नातेवाईक मृतदेह घेऊन गेले, परंतु ही महिला बाधित असून मृतदेह पळविला ...

बीड : महिलेच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने नातेवाईक मृतदेह घेऊन गेले, परंतु ही महिला बाधित असून मृतदेह पळविला असा आरोप करत नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने आरोग्य विभागाने आता पलटी मारली आहे. ही महिला कोरोनाबाधित होती, परंतु अनावधनाने नोंद करण्यास विसरल्याचे सांगितले आहे. चौकशी समितीच्या अहवालातून हा प्रकार उघड झाला आहे.

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील लता सुरवसे या महिलेला २१ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. २४ दिवस तिच्यावर कोरोनाबाधित म्हणून उपचार केले. १७ मे रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईक मृतदेह घेऊन गावी गेले. एवढ्यात आरोग्य विभागाने कॉल करून नातेवाईकांना मृतदेह परत आणण्यास सांगितले. नंतर बीडमध्ये अंत्यसंस्कार झाले, परंतु तरीही आरोग्य विभाग शांत न राहता नर्सला पुढे करत नातेवाईकांवर मृतदेह पळविल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत सुरू होती.

दरम्यान, यात डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, नातेवाईक यांचे जबाब घेण्यात आले. याचा अहवाल तयार करून समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अहवाल सादर केला. यात नर्स व डॉक्टरांचा योग्य संवाद झाला नाही, नातेवाईकांच्या दबावापाेटी चाचणी केली, तसेच या महिलेची यापूर्वीच ॲंटिजन चाचणी केली होती, परंतु त्याची नोंद अनावधानाने विसरल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे. यात अनेक तफावत असून आरोग्य विभागाच्या अंगलट हे प्रकरण येणार असल्याने यातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सीएस आणि समितीवरही संशय

एवढे गंभीर प्रकरण असतानाही समितीने अहवाल देण्यास उशीर केला. तसेच कागदपत्रांची पाहणी न करताच केवळ जबाब घेऊन गोलगाेल अहवाल दिल्याने व अहवाल प्राप्त होऊनही तत्काळ निर्णय न घेतल्याने जिल्हा शल्यचिकित्सकही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

महिलेची चाचणीच नाही

लता सुरवसे रुग्णालयात दाखल झाल्यापासून कोरोना चाचणीच झालेली नाही. झाली असती तर चाचणीचा सॅम्पल आयडी समितीपुढे का सादर केला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील ८६ हजार बाधितांची नोंद होते आणि याच महिलेची का विसरते? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.

चौकशी समितीचा अहवाल आला आहे. यात या महिलेची ॲंटिजन चाचणी केली होती, परंतु, अनावधानाने नोंद राहिल्याचे दिसते. तसेच अनेक मुद्दे आहेत. यावर लवकरच निर्णय घेऊ.

डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक बीड