शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 12:19 IST

Health Department leak Case: प्रत्येकाकडून सहा लाख रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : आरोग्य विभागाच्या लातूर उपसंचालक कार्यालयात कार्यरत प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याला पिशवीतून पैसे पुरवणारा शिपाई श्याम मस्के याला शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे (Health Department leak Case ) . पुण्याच्या सायबर पोलिसांकडून मिळालेले पत्र आणि संचालकांच्या आदेशानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी ही कारवाई केली आहे. श्याम हा शिपाई असला तरी तो बडगिरेचा उजवा हात होता. शिवाय सर्व पैसे वसुलीची जबाबदारी श्याम सरकारी नोकरीपेक्षाही चोखपणे पार पडत होता, असे सूत्रांकडून समजते.

३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षेचा पेपर फुटला. यात प्रशांत बडगिरेसह लोखंडी सावरगावच्या रुग्णालयातील डॉ. संदीप जोगदंड, शिरूर तालुक्यातील शिक्षक उद्धव नागरगोजे, बीडचा रहिवासी असलेला; परंतु भूममध्ये सहायक अधीक्षक असलेला राजेंद्र सानप आणि नेकनूर स्त्री रुग्णालयात पदस्थापना असतानाही बडगिरेच्या आशीर्वादाने लोखंडी सावरगावात प्रतिनियुक्तीवर काम करणारा श्याम मस्के या शिपायाला पुणे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच प्रकरणात सहसंचालक महेश बाेटले यालाही अटक करण्यात आली. बोटले आणि बडगिरे हेच पेपरफुटी प्रकरणाचे मास्टरमाइंड असल्याचे तपासातून उघड झाले होते; परंतु पैसे जमा करण्यासाठी बडगिरेने श्याम मस्के या शिपायाची खास नियुक्ती केली होती. कोणत्याही प्रकरणात बडगिरे हा मस्केमार्फतच पैसे स्वीकारत होता. हे काम मस्के चोखपणे पार पडत असे.

दरम्यान, सायबर पोलिसांच्या तपासात श्याम मस्के हा दोषी असल्याचे दिसताच त्यांनी बीडच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून मस्केवर कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी श्याम मस्केवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात बीड जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याचे आदेशही डॉ. साबळे यांनी दिले आहेत.

सहा लाख रुपयांचा दरया पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी बीडमधून नामदेव विक्रम करांडे (वय ३१, बीड ) या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या विद्यार्थ्याने बडगिरेला आठ लाख रुपये दिल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येकाकडून सहा लाख रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नामदेवनेच आठ लाख का दिले? याचा तपास पोलीस घेत आहेत. तसेच नामदेवप्रमाणेच आणखी विद्यार्थी बीडमध्ये असण्याची दाट शक्यता असून, सायबर पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

निलंबनाची कारवाई सायबर पोलिसांचे पत्र व संचालकांच्या आदेशावरून श्याम मस्के या सफाईगारावर निलंबनाची कारवाई केली आहे. याचा अहवालही वरिष्ठांना पाठविला आहे.-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

नाव येतील त्यांना अटक होईल बीडमधून एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. एका विद्यार्थ्याकडून बडगिरेने साधारण पाच ते सहा लाख रुपये घेतल्याचे दिसून येत आहे. तपास चालूच असून, ज्यांचे नाव येतील त्यांना अटक केली जाईल.-डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडfraudधोकेबाजी