शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

बीडमध्ये खोट्या चो-यांच्या तपासाने पोलिसांची डोकेदुखी; दीड महिन्यात तीन घटना उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 11:50 IST

एरव्ही ख-या चो-यांचा तपास करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहे. अशात काही नागरिक खोट्या चो-यांच्या तक्रारी करू लागल्याने आणखीनच ताण वाढला आहे. मागील दीड महिन्यात तब्बल तीन चो-या बनावट निघाल्याचे उघड झाले आहे. केवळ घरगुती वादातून असे बनाव केले जात आहेत. या तीनही घटनांत महिलाच ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे समोर आले आहे.

बीड : एरव्ही ख-या चो-यांचा तपास करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहे. अशात काही नागरिक खोट्या चो-यांच्या तक्रारी करू लागल्याने आणखीनच ताण वाढला आहे. मागील दीड महिन्यात तब्बल तीन चो-या बनावट निघाल्याचे उघड झाले आहे. केवळ घरगुती वादातून असे बनाव केले जात आहेत. या तीनही घटनांत महिलाच ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्ह्यांची संख्या घटविण्यासाठी जिल्हा पोलीस दल धावपळ करीत आहे. रात्रदिवस गस्त घालून चोºयांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. रात्री गस्त सुरू असताना दिवसाच चोºया होऊ लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. भरदिवसा चोºया झाल्याने पोलिसांचा वचक कमी झाला, असे आरोप केले जात होते. परंतु पोलिसांनी दिवसा झालेल्या चोºयांचा खोलवर जावून तपास केला असता अनेक धक्कादायक वास्तव समोर आले.

पहिली घटना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच घडली. बँकेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या हातातील एक लाख रूपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दीड महिन्यापूर्वी एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. ऐन अधीक्षक कार्यालयासमोरच लुटमारीची घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. तपास केला असता या महिलेने बँकेतून पैसेच काढले नसल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर दिवसभरात एकाही ग्राहकाने एक लाख रूपयांची रक्कम बँकेतून काढल्याचे दिसले नाही. तक्रारदार महिलेने मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या दोन मुलांवर संशय व्यक्त केला होता. त्या मुलांना विचारणा केली असता ते आपल्या वडिलांसोबत बँकेत आल्याचे समजले. यावरून हा सर्व प्रकार बनाव असल्याचे उघड झाले. आपल्याकडून खर्च झालेल्या पैशाचा घरी हिशोब कसा द्यायचा ? या भितीने महिलेने हा बनाव केला होता. यामध्येही विशेष पथकांसह शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हतबल झाले होते. यामध्ये तिच्याविरूद्ध अद्याप काहीच दाखल झालेले नाही.

दुसरी घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धोंडीपुरा भागात घडली. भरदिवसा आपल्या घरातून सहा लाख रूपये व दागिने चोरी झाल्याचा आरडाओरडा करण्यात आला. कॉन्स्टेबलपासून ते अधीक्षकांपर्यंत सर्वच या घटनेच्या तपासात व्यस्त झाले. विशेष पथके दाखल झाली. दुपारी एक वाजता झालेल्या चोरीचा तपास रात्री नऊ वाजता पोलिसांनी केला. सदरील महिलेने स्वार्थासाठी हे पैसे इतरत्र ठेवल्याचे समोर आले. चोरीची स्टोरी मात्र चित्रपटाला लाजवेल अशी केली होती. यामध्येही सदरील महिलेविरूद्ध अद्याप काहीच दाखल नाही.

तिसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अंबिका चौकात दोन दिवसांपूर्वी घडली. सासू-सुनेचा दीड तोळ्याच्या सोन्याच्या गंठनसाठी वाद होता. सासुला गंठन द्यायचे नाही, या हेतून सुनेने चोरीचा बनाव केला. यामध्ये पोलिसांनी धावपळ करुन एका दिवसातच तपास लावला होता. यामध्येही सदरील महिलेविरूद्ध गुन्हा दाखल झालेला नाही, हे विशेष.तीनही घटनांत महिलाच ‘मास्टरमार्इंड’दीड महिन्यात घडलेल्या तिनही घटनांमध्ये महिलांनीच डोके लावले आहे. घरगुती वादातून त्यांनी हे सर्व केल्याचे पोलीस तपासातून समोर आले. यंत्रणेची एवढी धावपळ करूनही पोलिसांकडून त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही, हेही विशेष आहे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर यापुढेही असे बनाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.पोलीस यंत्रणेची धावपळभरदिवसा चो-या झाल्याने पोलीस दलात खळबळ तर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांना होते.तपासाची चक्रे गतीने फिरविताच या तीनही चोºयांचा बनाव असल्याचे उघड झाले. यामध्ये मात्र पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली.