शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का रे भाऊ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्यातच हॉटेल उघडण्यास रात्री १०पर्यंत परवानगी दिली आहे. असे असले ...

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्यातच हॉटेल उघडण्यास रात्री १०पर्यंत परवानगी दिली आहे. असे असले तरी हॉटेलचालक व कामगारांचे लसीकरण अद्यापही पूर्णपणे झाले नसल्याचे दिसते. याला कामगारांचा अनुत्साहासह लसीचा तुटवडा कारण असल्याचे समोर आले आहे. सर्वांनी लस घेण्याची आवाहन करण्याबरोबरच मुबलक लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लाभार्थी संख्या जवळपास २१ लाखांच्या वर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. लसीकरण करण्यासाठी पूर्ण नियोजन केले जात असले तरी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे वास्तव बीडमध्ये आहे. त्यातच आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने सर्वत्रच गर्दी होत आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. यात हॉटेलचालक व कामगारांचा आढावा घेतला असता अनेकांचे लसीकरण झालेले नसल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोना पसरण्यासह त्यांनाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामगारांनी लस घ्यावी तर शासनाने लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

---

टपरीवर आनंदी आनंद

बीड शहरात गल्ली बोळांसह चौकाचौकात टपऱ्या थाटल्या आहेत. येथे कोणीही मास्कचा वापर करत नाही. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकून काही लोक सर्वत्र घाण करत असल्याचे दिसत आहे. या टपरी चालकांनीही लस घेतली नसल्याचे अनेक ठिकाणी सांगण्यात आले. सर्वत्र आनंदी आनंद असून त्यांना कोरोनाची कसलीच भीती नसल्याचे दिसते.

---

शासनाकडून जशी लस उपलब्ध होईल तसा केंद्रांना पुरवठा केला जात आहे. हॉटेल चालक, कामगारांची स्वतंत्र नोंद केली जात नाही. सर्वांनाच लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

-डॉ. बाबासाहेब ढाकणे, नोडल अधिकारी, बीड

....

शहरातील हाॅटेल्स १५०

सुरू असलेले हॉटेल्स १२०

कामगार संख्या १२००

...