शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खासबाग परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:05 IST

बीड नगर पालिकेने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी खासबाग परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.

ठळक मुद्देबीड पालिकेची कारवाई : रस्त्याने घेतला मोकळा श्वास; आजही कारवाई होणार

बीड : बीड नगर पालिकेने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी खासबाग परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामुळे परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. तर काहींनी कारवाईच्या भितीने स्वता:हून अतिक्रमणे काढून घेतली. शनिवारीही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.बीड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. हाच धागा पकडून पालिकेने शुक्रवारी खासबाग परिसरात मोहीम हाती घेतली. रस्त्यांवर शेड बांधून राहणाऱ्या तीन घरांवर हातोडा फिरविण्यात आला. तसेच इतर अतिक्रमणेही काढण्यात आली. तर याच भागातील सात नागरिकांनी आपण स्वत: अतिक्रमणे काढून घेतो, नुकसान करू नका, एका दिवसाची मुदत द्या, असे लेखी पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे या घरांवरील कारवाई टळली. शनिवारी कुठलेही म्हणने न ऐकून घेत अतिक्रमणे हटविली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.दरम्यान, खासबाग परिसरात अनेक महिन्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. खासबाग प्रमाणेच शहरात इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरूंद बनून वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. पालिकेने या अतिक्रमणांवरही हातोडा फिरवावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.ही कारवाई उपमुख्याधिकारी राहुल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग प्रमुख व्हि.टी.तिडके, भारत चांदणे, ज्योती ढाका, भागवत जाधव, आर.एस.जोगदंड, महादेव गायकवाड, गणेश वडमारे, राजु वंजारे आदींनी केली.

टॅग्स :BeedबीडEnchroachmentअतिक्रमण