शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गायरान हक्क अभियानाच्यावतीने अर्धनग्न मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

अंबाजोगाई : गायरान हक्क अभियानाच्या बीड जिल्ह्यातील गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. १५ ऑगस्ट ...

अंबाजोगाई : गायरान हक्क अभियानाच्या बीड जिल्ह्यातील गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.

१५ ऑगस्ट रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून अर्धनग्न मोर्चा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले. या मोर्च्यात वडवणी, केज, धारुर, परळी, अंबाजोगाई येथील शेकडो महिला, पुरुष मुलाबाळांसह सामील झाले होते.

गायरानधारक उषा पांडुरंग नवगिरे, नंदाबाई माणिक जोगदंड, सुशिला राम गायकवाड, राधा व्यंकट जोगदंड, सुनंदा गोपाळ जोगदंड, राम सखाराम गायकवाड, व्यंकट नारायण जोगदंड, माणिक कोंडीबा जोगदंड सामील होते.

या अर्धनग्न मोर्चाचे नेतृत्व गायरान हक्क अभियानाचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. विलास लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर जोगदंड, वंचित ब. आघाडी तालुका अध्यक्ष संजय तेलंग, वंचित प्रवक्ते गोविंद मस्के, वंचित महासचिव उमेश शिंदे, रमेश कोळी, धम्मा कासारे, बालू धिरे, मुंजा गायकवाड, अमोल जोगदंड यांनी केले.

सरकारी गायरान अतिक्रमण धारकांच्या नावे तात्काळ नियमानुकूल करावे, त्यांच्या १ ई ला नोंदी घेऊन वहीतीक्षेत्राचे पेरणी पंचनामे करावेत, फौजदारी प्रकरणाचा दस्त तसेच संबंधित ग्रामपंचायतीने जर गायरान धारकाच्या हितामध्ये अतिक्रमण असल्याचे प्रमाणपत्र दिले असेल, तर त्याआधारे अल्पभूधारक योजना, प्रमाणपत्राच्या आधारे पीक विमा, पीक कर्ज योजना, मोफत बी-बियाणे योजनेचा लाभ द्यावा, अतिक्रमण असल्याचे माहीत असताना जर संबंधित ग्रामपंचायतीने गायरान वनीकरणाकडे वर्ग करण्याचे ठराव पारित केले असतील, तर त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

160821\img-20210815-wa0131.jpg

अंबाजोगाईत निघाला मोर्चा