तालुक्यात शनिवार रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यात शनिवारी सायंकाळी अचानक शहरात पावसाने हजेरी लावत तालुक्यातील तलवाडा चकलांबा, खळेगाव, पौळाचीवाडीसह अनेक ठिकाणच्या परिसरात जवळपास अर्धा तास हजेरी लावली. त्याचबरोबर हरभऱ्या ऐवढ्या आकाराच्या गारा देखील पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला हरभरा तसेच गहू पिके या पावसाने भिजली. शासनाने नुकसान झालेल्या पिकाची तातडीने पहाणी करून पंचनामा करावा व झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र गावडे, भाऊसाहेब वळकुंडे, मनोज शेंबडे यांनी केली आहे. हरभरा पिकाचा फोटो तलवाडा परिसरातील व गारांचा फोटो खळेगाव येथील आहे. )
===Photopath===
200321\sakharam shinde_img-20210320-wa0044_14.jpg~200321\sakharam shinde_img-20210320-wa0032_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तलवाडा व चकलांबा, खळेगावंसह अनेक ठिकाणच्या परिसरात अवकाळी पाऊस गारांसह झाल्याने हरभरा, गव्हासह विविध पिके पावसाने भिजल्याने शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे.~