शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

परळीत पकडला ३० लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:17 IST

अंधाराचा फायदा घेऊन बीडकडे २० पोती गुटखा घेऊन निघालेला टेम्पो अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री परळी तालुक्यातील टोकवाडीजवळ करण्यात आली.

ठळक मुद्देएएसपींच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : अंधाराचा फायदा घेऊन बीडकडे २० पोती गुटखा घेऊन निघालेला टेम्पो अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री परळी तालुक्यातील टोकवाडीजवळ करण्यात आली. यामध्ये जवळपास ३० लाख रूपयांचा गुटखा व टेम्पो जप्त केला आहे. चालकाने मात्र अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मागच्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

परळीहून बीडकडे एका टेम्पोतून (एमएच २५ यू १०४९) गुटखा जात असल्याची माहिती बोºहाडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक पाठवून सापळा लावला. टोकवाडीजवळ टेम्पो येताच पथकाने तो अडविला. पोलीस पाहताच चालकाने अंधाराचा फायदा घेत पलायन केले. त्यानंतर तपासणी केली असता टेम्पोत तब्बल २० पोते गुटख्याने भरलेले दिसून आले. हा सर्व मुद्देमाल जप्त करून परळी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर अन्न व प्रशासनाला माहिती देण्यात आली.

पंचनामा झाल्यावर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल, असे परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.नरहरी नागरगोजे, सखाराम पवार, बाबासाहेब आचार्य, सचिन सानप यांनी केली.तिसरी मोठी कारवाईमागील काही दिवसांपासून गुटखा पकडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, माजलगावात उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी धाडसी मोठ्या कारवाया केल्यानंतर मंगळवारी रात्री अजित बोºहाडे यांच्या पथकाने तब्बल ३० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला.

आरोपी पळाल्याने कारवाई रखडणारसदरील प्रकरणात आरोपीने अंधाराचा फायदा घेत पलायन केले होते. अन्न प्रशासनाच्या नियमानुसार पंचनामा आणि गुटख्याचा नमुना घेण्यासाठी आरोपी असावा लागतो. पोलिसांच्या मदतीने ते घेता येत नाही.आरोपी असेल तरच नुमना तपासणीसाठी घेता येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांनी सांगितले. जोपर्यंत आरोपी हजर होत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नसल्याचेही केरूरे यांनी सांगितले. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांना आता आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ धावाधाव करावी लागणार आहे.